सांगली - अवैध वाळू तस्करी प्रकरणी जप्त केलेला वाळूचा डंपर वाळू माफियाने Sand smugglers थेट तहसील कार्यालयाच्या आवारातूनच चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. सांगली शहरातल्या राजवाडा चौक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये मधून हा ट्रक चोरून नेल्याचा प्रकार समोर dumper stole from Tehsil office premises Sangali आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मालकानेच केली डंपरची चोरी अवैध वाळू तस्करी प्रकरणी तहसील कार्यालयाकडून Tehsil office Sangali, कवठे महांकाळ येथील दीपक पाटील यांच्या मालकीचा एम.एच. 11 एएल 6439 हा डंपर अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी पकडण्यात आला होता. या डपंरमध्ये 3 ब्रास वाळू आढळून आली होती. सदरचा ट्रक जप्त करून सांगली शहरातल्या राजवाडा चौक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये लावण्यात आला होता. मात्र 22 ऑगस्ट रोजी सदरचा डंपर हा तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडून शोध घेण्यात आला असता, वाळू तस्कर करणारे डंपर मालक दीपक पाटील यांनी कारवाई केलेला डपंर चोरून नेल्याचे समोर आले. तहसील कार्यालयाकडून सांगली शहर पोलीस ठाण्यात दीपक पाटील यांच्या विरोधात 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sand smugglers stole the dumper seized from the Tehsil office premises in Sangali
हेही वाचा 50 हजार रकमेची बॅग चोरट्याकडून लंपास; भरदिवसा घडला प्रकार