ETV Bharat / state

हे तर आंधळे, मुके आणि बहिरे सरकार - सदाभाऊ खोत - Sadabhau Khot slammed MH gov

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिवजयंतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
author img

By

Published : Feb 19, 2021, 5:12 PM IST

Updated : Feb 19, 2021, 7:42 PM IST

सांगली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे दारुडे सरकार, अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर विरोधक अर्थसंकल्प अधिवेशनात धारेवर धरतील. या भीतीने पळ काढण्यासाठी आता कोरोनाचा बाऊ केला जात आहे. हे सरकार आंधळे, मुके आणि बहिरे सरकार असल्याची टीकाही आमदार खोत यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिवजयंतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला हे सरकार यात्रा काढत आहे. दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम होत आहेत. परंतु जनतेचा आवाज गेल्या 2 वर्षांपासून सरकार दाबण्याचे काम करत आहे. जेणेकरून जनता रस्त्यावर येऊ नये, म्हणून काही वेळा हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपते. काही वेळा कोरोनाच्या आडाला दडून बसते. आता तर अधिवेशन तोंडावर आले आहे. आता या सरकारला या अधिवेशनातून पळ काढायचा आहे. म्हणून आता सगळीकडे कोरोना वाढल्याचे सरकार बोंब मारत आहे.
सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का ? सहा महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत, याचा अर्थ असल्याची टीका आमदार खोत यांनी केली.

हे तर आंधळे, मुके आणि बहिरे सरकार

हेही वाचा-निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात - शिवसेना आमदार वैभव नाईक

हे तर दारुडे सरकार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या सरकारकडून राज्यात शिवजयंती साजरी करू दिली जात नाही. मग तुमच्या यात्रा, दौरे, मेळावे कसे चालतात, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. त्यावेळी सोशल डिस्टन्स कुठे जातो? या सरकारचे 'एकच प्याला' या नाटकाप्रमाणे वर्णन करावे लागले. हे सरकार दारुडे सरकार आहेत. त्यामुळे या सरकारने राज्यात दारू सुरू ठेवून मंदिरे बंद ठेवली होती. अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा टोलाही खोत यांनी यावेळी लगावला आहे.

हेही वाचा-विरोधकांचा कोथळा काढून शिवरायांनी स्वराज्य टिकवले, महाराष्ट्रातही तेच होईल- संजय राऊत

Last Updated : Feb 19, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.