सांगली - ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीत बोट उलटली होऊन ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक रवाना झाले आहे.
शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी आज सकाळी तब्बल ५६.१० फुटांवर पोहोचली. पाणी पातळी वाढल्याने शहराला आणि नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, भारतीय लष्कर आणि नौदलाकडून बचाव कार्य राबविण्यात येत आहे.
काय आहे घटना -
ब्रम्हनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली खासगी बोट कृष्णा नदीत उलटली असून यात १५ जण बुडाले आहेत. तसेच बोटमधील १६ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या बोटीत ३० जण असल्याची माहिती मिळाली आहे. याठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाताना पलटी झाल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान, एकूण ९ जण बुडून मृत्युमुखी पडले असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये ७ महिला, १ पुरुष आणि २ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य रवाना झाले आहे.