सांगली - कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आणि शेतकरी जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भाजपाची राज्यव्यापी "किसान आत्मनिर्भर यात्रा" सांगलीच्या येडेमच्छिंद्रगड येथून सुरू झाली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा गावागावात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचे फायदे सांगण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही यात्रा असणारा आहे. 4 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. या यात्रेचा समारोप सांगलीच्या इस्लामपूर येथील पेठ याठिकाणी भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने माजी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी या यात्रेबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी साधलेला संवाद.