ETV Bharat / state

पाण्यासह विविध मागण्यांसाठी तासगावातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Sangali

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे येथील तलावात शेतीसाठी पाणी सोडावे तसेच अन्य मागण्यांसाठी लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी आरवडेमध्ये आज रास्तारोको आंदोलन केले.

रास्तारोको करताना शेतकरी
author img

By

Published : May 27, 2019, 10:08 PM IST

सांगली- पाण्यासह विविध मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील शेतकऱयांनी आज रस्ता रोको आंदोलन केले. आरवडे येथे शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे आटपाडी-तासगाव मार्गावरील वाहतूक सुमारे २ तास ठप्प होती. प्रशासनाकडून तातडीने मागण्यांची दखल न घेतल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱयांनी दिला आहे.

शेकऱ्याची प्रतिक्रिया

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे येथील तलावात शेतीसाठी पाणी सोडावे तसेच अन्य मागण्यांसाठी लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी आरवडेमध्ये आज रास्तारोको आंदोलन केले. लोंढे तलावात तात्काळ पाणी सोडा, पुणदी उपसा योजना तात्काळ सुरू करा, उपसाबंदी काळातील पाणीपट्टी कमी करा, तोडलेली वीज जोडणी तात्काळ जोडा याशिवाय अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली होती.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव म्हणाले की, लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मागणीनुसार विसापूर पुणदी उपसा सिंचन योजनांवर आवश्यक असणारी पाणीपट्टी भरुन काय चूक केली काय? पाणीपट्टी भरल्यानंतर त्यांना पाणी देणे आवश्यक होते. पीक वाळून शेतकरी उद्धवस्त होत आहे, पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

तर रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पवार यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले नाही तर शेतकरी आक्रमक होतील आणि तीव्र आंदोलन करतील. पाटबंधारे विभागाने आजपर्यंत या शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. यापुढे अन्याय सहन करून घेणार नाही. पाणीपट्टी भरून पीक वाळले तर प्रशासनावर फौजदारी दाखल करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे दिवंगत आर. आर. पाटील यांनी सुरू केलेल्या योजनांची संपूर्ण वाट लागली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यापुढील काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पाटबंधारे विभागाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असे मत युवराज पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभाग व पोलीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, या रास्तारोको आंदोलनामुळे तासगाव भिवघाट, आरवडे मांजर्डे रोडवर दोन्ही बाजूस एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर या आंदोलनात प्रथमच रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्याचे दिसून आल्या.

Intro:सरफराज सनदी - सांगली

AVB

Feed send file name - MH_SNG_SHETKARI_RASTA_ROKO_27_MAY_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SHETKARI_RASTA_ROKO_27_MAY_2019_BYT_1_7203751

स्लग - पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर; रास्तारोको करत पाण्यासह विविध मागण्यांसाठी करण्यात आले आंदोलन...

अँकर - पाण्यासह विविध मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील शेतकरयांनी रस्ता रोको आंदोलन केले.आरवडे येथे शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे सुमारे २ तास आटपाडी- तासगाव मार्गावरील वाहतूक ठप्प होती. प्रशासनाकडून तातडीने मागण्यांची दखल न घेतल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकरयांनी दिला आहे.Body:सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे येथील तलावात शेतीसाठी पाणी सोडा व अन्य मागण्यांसाठी लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी आरवडे मध्ये आज रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.लोढे तलावात तात्काळ पाणी सोडा,पुणदी उपसा योजना तात्काळ सुरू करा,उपसाबंदी काळातील पाणीपट्टी कमी करा,तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडा याशिवाय अन्य मागण्यांसाठी हा रास्तारोको आंदोलन करण्यात आला.या आंदोलनात रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली होती.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव यांनी बोलताना, लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मागणीनुसार विसापूर पुणदी उपसा सिंचन योजनांवर आवश्यक असणारी पाणीपट्टी भरुन काय चूक केली काय ? पाणीपट्टी भरल्यानंतर त्यांना पाणी देणे आवश्यक होते.शेतकरी वर्गासाठी शेती हा त्यांचा उद्योग आहे,त्यासाठी त्यांना नोकऱ्या राहिल्या पण किमान पाणी तरी द्यायचं.पीक वाळून शेतकरी उधवस्थ होत आहे, पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

तर रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पवार यांनी बोलताना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी नाही मिळाले, तर शेतकरी आक्रमक होतील आणि तीव्र आंदोलन करतील.पाटबंधारे विभागाने आजपर्यंत या शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे.यापुढे अन्याय सहन करून घेणार नाही.पाणीपट्टी भरून पीक वाळले तर प्रशासनावर फौंजदारी दाखल करू.असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे स्व.आर.आर.आबांनी केलेल्या योजनांची संपूर्ण वाट लागली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.यापुढील काळात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पाटबंधारे विभागाच्या विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करू.असे मत युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभाग व पोलीस यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याने नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या रास्तारोको आंदोलनामुळे
तासगाव भिवघाट,आरवडे मांजर्डे रोडवर दोन्ही बाजूस एक कि.मी.पेक्ष्या जास्त लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

तर या आंदोलनात प्रथमच रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्याचे दिसून आल्या.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.