ETV Bharat / state

छत्रपतींचे गुप्तहेर बहिर्जी नाईकांच्या स्मारकाबाबत निर्णय घ्या; रामोशी समाजाची मागणी - बानूरगडावर स्मारक

दुर्लक्षित असणाऱ्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायहक्कासाठी लढणाऱ्या रामोशी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक वाटचाल अधिक गतीने धरली पाहिजे. तसेच रामोशी समाजाने आता राजकीय भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत पडळकर यांनी व्यक्त केले. तसेच बानूरगड याठिकाणी राज्य सरकारकडून तातडीने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी स्मारक उभा करण्याबाबतची भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे स्मारक
author img

By

Published : Aug 26, 2019, 1:07 PM IST

Updated : Aug 26, 2019, 1:14 PM IST

सांगली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे तातडीने निर्माण करावे, अशी मागणी रामोशी समाज आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच सरकारने याबाबत तत्काळ भूमिका घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. खानापूरच्या बानुरगड येथे आयोजित शौर्य अभिवादन सोहळ्यात ही मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजातील बहिर्जी नाईक हे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. शत्रूंच्या राज्यातील छावण्यांमध्ये वेगवेगळे वेशांतर करत बहिर्जी नाईक हे शत्रूंची गुप्त महिती काढुन छत्रपतीपर्यंत पोहोचवत होते. अशाच एका कामगिरी दरम्यान शत्रूंच्या हल्ल्यात बानुरगड येथे बहिर्जी नाईक हे धारातीर्थ पडले. त्यानंतर याच गडावर बहिर्जी नाईक यांची समाधी बांधण्यात आली.

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बानूरगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. मात्र, नाईक यांची समाधी आजही दुर्लक्षित आहे. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त समस्त रामोशी समाज बहिर्जी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी बानुरगडावर जमा होतो.

बहिर्जी नाईकांच्या स्मारकाची मागणी

बहिर्जी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समिती व एम.एम.ग्रुप यांच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रामोशी बांधव बानुरगडावर उपस्थिती लावतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही बानुरगडावर रविवारी मोठ्या उत्साहात हा अभिवादन सोहळा पार पडला. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदभाऊ लाड, अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह बहिर्जी नाईक यांचे वंशज व रामोशी समाजातील नेते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, दुर्लक्षित असणाऱ्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायहक्कासाठी लढणाऱ्या रामोशी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक वाटचाल अधिक गतीने धरली पाहिजे. तसेच रामोशी समाजाने आता राजकीय भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत पडळकर यांनी व्यक्त केलं तसेच बानुरगड याठिकाणी राज्य सरकारकडून तातडीने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी स्मारक उभा करण्याबाबतची भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

तर भाजप सरकारविरोधात भूमिका घेऊ -

यावेळी समस्त रामोशी समाज बांधवांना ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाबाबत सरकारने त्वरित भूमिका जाहीर करावी, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू असा आक्रमक पवित्रा जाहीर केला. तसेच सरकारने याची दाखल न घेतल्यास भाजप सरकार विरोधात राजकीय भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांनी दिला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

File name - mh_sng_01_bahirji_naik_smaraka_issue_vis_01_7203751

- mh_sng_01_bahirji_naik_smaraka_issue_byt_06_7203751

स्लग - छत्रपतींचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घ्या, अन्यथा रामोशी समाजा रस्त्यावर उतरले..

अँकर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे स्मारक तातडीने निर्माण करण्याची भूमिका सरकारने घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडु असा इशारा रामोशी समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. खानापुरच्या बानूरगड येथे आयोजित शौर्य अभिवादन सोहळ्यात निर्णय घेण्यात आला आहे.
Body:छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी आजही दुर्लक्षित आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बानुरगडावर बहिर्जी नाईक यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या जयंती निमित्त समस्त रामोशी समाज बहिर्जी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी जमा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजातील बहिर्जी नाईक हे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते,शत्रूंच्या राज्यात,त्यांच्या छावण्यांमध्ये वेगवेगळे वेष बदलून जाऊन बहिर्जी नाईक हे शत्रूंच्या महित्या काढुन छत्रपती यांच्या पर्यंत पोहचवता असे,आणि अश्याच्या एका कामगिरी दरम्यान शत्रूंच्या हल्ल्यात बानूरगड येथे बहिर्जी नाईक हे धारातीर्थ पडले.आणि बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांची समाधी बांधण्यात आली.आणि त्यांच्या जयंती निमित्ताने बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून
अखिल भारतीय बेडर ,बेरड रामोशी समाज कृती समिती व एम.एम.ग्रुप यांच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रामोशी बांधव बानूरगडावर उपस्थिती लावतात.रविवारी मोठ्या उत्साहात बानूरगडावर हा अभिवादन सोहळा पार पडला,
यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदभाऊ लाड ,अखिल भारतीय बेडर ,बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह बहिर्जी नाईक यांचे वंशज व रामोशी समाजातील नेते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी आयोजित सभेत गोपीचंद पडळकर यांनी दुर्लक्षित असणाऱ्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायहक्कासाठी लढणाऱ्या रामोशी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक वाटचाल अधिक गतीने धरली पाहिजे.तसेच रामोशी समाजाने आता राजकीय भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत पडळकर यांनी व्यक्त केलं तसेच बानुरगड याठिकाणी राज्य सरकारकडून तातडीने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी स्मारक उभा करण्याबाबतची भूमिका जाहीर करण्याच घेतली पाहिजे अशी मागणी करत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

बाईट - गोपीचंद पडळकर - नेते ,वंचित बहुजन आघाडी.

व्ही वो - तर समस्त रामोशी समाज बांधवांच्या कडून ही यावेळी सरकारने ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाबाबत त्वरित भूमिका जाहीर करावी अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच सरकारने याची दाखल न घेतल्यास भाजपा सरकार विरोधात राजकीय भूमिका घेण्याचा इशारा यावेळी अखिल भारतीय बेडर ,बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांनी दिला आहे.

बाईट - मोहनराव मदने - अध्यक्ष ,
अखिल भारतीय बेडर ,बेरड रामोशी समाज कृती समिती.
Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.