ETV Bharat / state

सत्तेचा माज आणू नका, अन्यथा पायात पत्रे ठोकल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी - शेकाप

सत्तेसाठी भाजपची चमचेगिरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, की त्यांच्या बुडाखाली खुर्ची गेली की, त्यांना कुत्रही विचारणार नाही, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

Raju Shetti
author img

By

Published : Mar 28, 2019, 1:52 AM IST

सांगली - देशात कायमस्वरूपी सत्तेचा ताम्रपट कोणालाही मिळाला नाही, त्यामुळे सत्तेचा माज आणू नका,अन्यथा एके दिवशी तुमच्या पायात पत्रे ठोकल्याशिवाय सोडणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला दिला आहे. तसेच भाजपची चमचेगिरी करणाऱ्यांच्या बुडाखालची खुर्ची गेल्यावर कुत्रं पण विचारणार नाही,असा टोला शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे आयोजित लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

राजू शेट्टी हातकणंगले मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून राजू शेट्टी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम तसेच नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रीय नेते रामपाल सिंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार सभेत राजू शेट्टी बोलताना

यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. या देशातील हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. कारण हा प्रश्न भविष्याचा आहे. या देशातील लोकशाही बुडवून नरेंद्र मोदी यांना हुकूमशाही आणायची आहे, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. तसेच ५ वर्ष देश मोदींच्या हातात होता. मात्र, मोदींनी देशावर ८२ हजार कोटींचे कर्ज केले आहे. या कर्जाचा हिशोब आता मोदींना जनतेला द्यावा लागेल, असेही ते म्हणाले. तर पुलवामा हल्ल्यावरूनही पाटील यांनी मोदींवर घणाघाती टीका केली.

या सभेत राजू शेट्टी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. २०१४ साली नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आले. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांची जाण राहिली नाही. तसेच जोपर्यंत तुमची वर्गणी येईल तो पर्यंत मी निवडणूक लढवत राहिल, ज्यावेळी पैसे येणे बंद होईल, त्यावेळी मी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिकाही शेट्टींनी स्पष्ट केली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

PKG

FEED SEND -FILE NAME - R_MH_1_SNG_27_MARCH_2019_SWABHIMANI_PRACHAR_SHUBHARAMBH_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_6_SNG_27_MARCH_2019_SWABHIMANI_PRACHAR_SHUBHARAMBH_SARFARAJ_SANADI

स्लग - सत्तेची माज आणू नका,अन्यथा पायात पत्रे ठोकल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टींचा भाजपाला इशारा.

अँकर - देशात कायमस्वरूपी सत्तेचा ताम्रपट कोणालाही मिळाला नाही, त्यामुळे सत्तेचा माज आणू नका,अन्यथा एके दिवशी तुमच्या पायात पत्रे ठोकल्या शिवाय सोडणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला दिला आहे.तसेच भाजपाची चमचेगिरी करणारयांच्या बुडाखालची खुर्ची गेल्यावर कुत्रं पण विचारणार नाही,असा टोला शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. Body:व्ही वो - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटला आहे.हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणारे खासदार राजू शेट्टी यांचा या प्रचार शुभारंभ प्रसंगी महाआघाडी मधील नेत्यांनी उपस्थिती लावली होती.सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातुन राजू शेट्टी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम तसेच नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील राष्ट्रीय नेते रामपाल सिंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी शुभारंभानिमित्त आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वर जोरदार टीका केली.या देशातील हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे..कारण हा प्रश्न भविष्याचा आहे.आणि या देशातील लोकशाही बुडवून नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही आणायची आहे.असा आरोप जयंतराव पाटील यांनी यावेळी केला. तसेच पाच वर्ष देश मोदींच्या हातात होता.मात्र मोदींनी देशावर ८२ हजार कोटींचे कर्ज केलं आहे.आणि या कर्जाचा हिशोब आता नरेंद्र मोदींना जनतेला द्यावा लागेल.अस मत यावेळी जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.तसेच देश सुरक्षित आहे. असे म्हणणाऱ्या मोदींनी पुलवामा हल्ला झाला,त्यावेळी देश तुमचा हातात होतात.मग जवान का मारले गेली ? अतिरेकी या देशात आले कशी ? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर देण्याची गरज आहे,असे मत जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.तसेच सांगलीच्या जागेच्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानीला हातकणंगले मतदार संघाची जागा दिली आहे आणि १ जागा काँग्रेसने द्यायची आहे.पण सांगलीची जागा स्वाभिमानी घ्यावी असा आम्ही सांगितलं नाही,असे जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बाईट - जयंतराव पाटील - प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

व्ही वो - या सभेत खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत,मोदींनी शेतकऱ्यांची केव्हा फसवणूक केली.२०१४ साली नरेंद्र मोदी निवडून आले.ते शेतकऱ्याच्या जिवावावर आणि मात्र त्यांना शेतकऱ्याची जण राहिली नाही.तसेच स्वामिनाथन आयोग प्रमाणे शेतीमालाला भाव ही दिला नाही.या उलट शेतकऱ्यांना बुडवायचे काम मोदींना केले.असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.तसंच जो पर्यंत तुमची वर्गणी येईल तो पर्यंत मी निवडणूक लढवत राहीन,आणि ज्यावेळी पैसे येणे बंद होईल,त्यावेळी मी निवडणूक लढवणार नाही.अशी भूमिका शेट्टी यांनी केली.त्याच बरोबर माझी संपत्ती बाबत काही लोकांच्या मनात एक चर्चा आहे.पण संपत्ती वाढली नाही ,वाढली असेल तर अशी संपत्ती आणून दाखवावी माझी सर्व संपत्ती त्याला देईन.असं शेट्टी यांनी जाहीर केला आहे.त्याच बरोबर प्रत्येक वेळी माझी वेगळी भूमिका असते,असा आरोप माझ्यावर केला जातो.पण मी एवढे सांगतो,माझी नाळ शेतकऱ्यांशी आहे.त्यात कधी कमी पडू देणार नाही.असं शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच भाजपामध्ये गाणे हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं कबूल करत ,आज मुख्यमंत्री सत्तेची धमकी देत आहेत भुजबळांना जामिनावर सुटले आहात,अशी धमकी दिली आहे.आणि मी ही जामिनावर सुटला आहे,त्यामुळे माझी काय वाकडी करायची ती करा,मला काही फरक पडत नाही,असा आव्हान शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला आहे.तसेच देशात कायमस्वरूपी सत्तेचा तांबे पण कोणाला मिळाले नाही त्यामुळे सत्तेचा माज येऊ देऊ नका ,अन्यथा एके दिवशी तुमच्या पायात पत्रे ठोकले शिवाय सोडणार नाही,असा इशारा राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे.तर सत्तेचे भाजपाची लांगूलचालन आणि चमचेगिरी करणार्यांनी लक्षात ठेवाव,की त्यांच्या बुडाखाली खुर्ची गेली की, त्यांना कुत्रही विचारणार नाही.असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला आहे.

बाईट - राजू शेट्टी - खासदार व उमेदवार - स्वाभिमानी शेतकरी संघटना, हातकणंगले - लोकसभा मतदार संघ.
Conclusion:महाआघाडीतील मित्रपक्ष म्हणून सामील झालेल्या मुद्द्यावर बोलताना,आधी केलेला संघर्ष हे विसरुन या निवडणुकीत आमचा काटा काढू नका,ही कळकळीची विनंती आहे.कारण याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.आणि काटा काढायचा असेल तर ववेगळ्या पद्धतीने नंतर काढा.अशी मिश्किल विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मित्रपक्ष आणि जयंत पाटील यांना यावेळी केली आहे.

बाईट - राजू शेट्टी - खासदार व उमेदवार - स्वाभिमानी शेतकरी संघटना, हातकणंगले - लोकसभा मतदार संघ.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.