सांगली - देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्हाधिकार्यांपासून कर्मचारी आणि नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत सर्वांनाच पाचशे रुपये वेतन प्रतिमहिना द्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.
सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मदत म्हणून देते. शेतकरी जर महिना ५०० रुपयात काटकसरीने जगतो, तर सरकारी नोकरदारांना काय अडचण आहे ? असा सवाल रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था बिघडवणाऱ्या उद्योग क्षेत्राला कोणतीही मदत देऊ नये. हे पांढरे हत्ती पोसण्याची काही गरज नाही, असा सल्लाही रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.