ETV Bharat / state

शेतकऱ्यांची २८० कोटींची एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा - रघुनाथ पाटील

एकीकडे शेतकऱ्यांची कारखान्याकडील थकित देणी शासन वसूल करत नाही. पण शेतकऱ्यांची थकित देणी मात्र जबरदस्तीने वसूल केली जात आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांना खासदार, आमदार यांच्याकडून अभय दिले जात असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला.

author img

By

Published : May 3, 2019, 4:34 PM IST

Updated : May 3, 2019, 9:19 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताना

सांगली - शेतकऱ्यांची २८० कोटी रुपयांची एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून तत्काळ थकाबाकी वसूल करून शेतकऱ्यांची थकित देणी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताना

ऊस गळाप हंगाम संपला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यात आलेली नाही. काही कारखाने वगळता जवळपास सर्वच कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. थकित एफआरपी देण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर जप्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कारवाई होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली.

एकीकडे शेतकऱ्यांची कारखान्याकडील थकित देणी शासन वसूल करत नाही. पण शेतकऱ्यांची थकित देणी मात्र जबरदस्तीने वसूल केली जात आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांना खासदार, आमदार यांच्याकडून अभय दिले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

आज जिल्ह्यातील काही साखर कारखाने वगळता इतर कारखान्यांकडून २८० कोटी रुपयांची एफआरपी थकित असून ती कायद्याप्रमाणे देणे बंधनकारक आहे. कायदा मोडणाऱ्यांवर जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून कारवाई करण्याची जबाबदारी असल्याचे मत रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी ८ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send - file name - R_MH_1_SNG_03_MAY_2019_FRP_ISSUE_SARFARAJ_SANADI -TO - R_MH_3_SNG_03_MAY_2019_FRP_ISSUE_SARFARAJ_SANADI

स्लग - शेतकरयांची २८० कोटींची एफआरपी थकवनाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा - शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटलांची मागणी .

अँकर - 280 कोटींची एफआरपी थकवणारया कारखान्याकडून तातडीने वसूल करून शेतकरयांचे थकीत देणी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच दुध खरेदी दरात होणारी कपात थांबवावी अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. Body:व्ही वो - ऊस गळाप हंगाम संपला आहे.मात्र अद्याप सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकरयांची एफआरपी देण्यात आली नाही.काही कारखाने वगळता जवळपास सर्वच कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे.तर थकीत एफआरपी देण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर जप्तीचे आदेशही देण्यात आले आहेत.मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कारवाई होत नसल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली
सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली.यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी कायदा मोडणाऱ्यांना खासदार ,आमदार यांच्याकडून अभय दिले जात आहे ,असा आरोप करत एकी कडे शेतकरयांची कारखान्याकडील थकीत देणी शासन वसूल करत नाही पण शेतकरयांची थकीत देणी मात्र जबरदस्तीने वसुली केली जाते असा आरोप करत आज जिल्ह्यातील काही साखर कारखाने वगळता इतर कारखान्यांकडून २८० कोटी एफआरपी थकीत असून ती कायद्या प्रमाणे देणे बंधनकारक असून कायदा मोडणारयांच्या वर जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून कारवाई करण्याची जबाबदारी असल्याचं मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.तर याबाबत जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसात याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.तर दूध दर खरेदीतही शेतकरयांची लूट सुरू असून शासनाचा दूध दराचा अध्यादेश काढूनही काही उपयोग नाही.असं मत यावेळी व्यक्त केला आहे.

बाईट - रघुनाथदादा पाटील - नेते ,शेतकरी संघटना .
Conclusion:
Last Updated : May 3, 2019, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.