ETV Bharat / state

वसंतदादा पाटील घराणे कदापी भाजपत जाणार नाही; प्रतिक पाटलांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Mar 21, 2019, 8:31 PM IST

आपल्या कुटुबीयांपैकी कोणीही भाजपत जाणार नसल्याचे स्पष्टीकरण प्रतिक पाटील यांनी दिले आहे.

प्रतिक पाटील

सांगली - महाराष्ट्रात वसंतदादा पाटील घराणे म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच वसंतदादा पाटील घराणे असे असताना जाणीवपूर्वक आमच्या कुटुबांविषयी वावड्या उठविल्या जातात. आमच्या कुटुंबातील सदस्य कदापीही भाजपमध्ये जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिले आहे.

प्रतिक पाटील

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर वसंतदादा पाटील घराण्याचे सदस्यही भाजपत प्रवेश करणार अशी माध्यमात चर्चा होती. यासंबधी स्पष्टीकरण देताना प्रतीक पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वसंतदादा पाटील घराणे काँग्रेसशी आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिले असून यापुढेही राहील. काँग्रेसने नेहमीच आमच्या कुटुंबाला भरभरून दिलंय त्यामुळे भाजपकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या निवडणुकीच्या दरम्यान कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलतांना प्रतिक पाटील म्हणाले की, मला आता सक्रिय राजकारणात फारसा रस नाही. त्यामुळे आपले बंधू विशाल पाटील यांच्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. मात्र, काँग्रेसकडून ही जागा मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत आपल्याला खंत वाटत असल्याचे प्रतीक पाटील यांनी यावेळी बोलून दाखविले, असे असले तरी आपण आणि आपले कुटुंबीय काँग्रेस सोडून कदापिही भाजपमध्ये जाणार नसल्याचे यावेळी प्रतीक पाटलांनी स्पष्ट केले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

feed send - file name - R_MH_1_SNG_21_MARCH_2019_PRATIK_PATIL_ON_BJP_CLARIFICATION_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_21_MARCH_2019_PRATIK_PATIL_ON_BJP_CLARIFICATION_SARFARAJ_SANADI

स्लग - वसंतदादा घराणे कदापिही भाजपात जाणार नाही - माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील ..

अँकर - वसंतदादा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे वसंतदादा असताना भाजपामध्ये कदापीही वसंतदादा कुटुंबतील सदस्य जाणार नाही ,असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिला आहे.मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर वसंतदादा घराण्याचे भाजपात प्रवेश होणार या चर्चेवर प्रतीक पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Body:व्ही वो - विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबाच्या भाजपात प्रवेश झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधील आणखी एक घराणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.सांगलीतील वसंतदादा घराणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.यावर वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.भाजपसोबत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.आणि वसंतदादा घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहे.
त्यामुळे वसंतदादा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे वसंतदादा अशी आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ओळख असल्याने वसंतदादा कुटुंबीय भाजपमध्ये जाणार नाही,असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.काँग्रेसने नेहमीच कुटुंबाला भरभरून दिलंय, त्यामुळे भाजपकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही,आणि भाजपाला फायदाही होऊ शकणार नाही,असं मतही प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची भेट सुद्धा झाली नाही.असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून बोलताना आपल्याला आता सक्रिय राजकारणात फारसा रस नाही.त्यामुळे आपले बंधू विशाल पाटील यांच्यासाठी आपण प्रयत्नशील होतो.मात्र काँग्रेसकडून ही जागा मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत.याबाबत आपल्याला खंत वाटत असल्याचं प्रतीक पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.असे असले तरी काँग्रेस सोडून आपण आणि आपले कुटुंबीय कदापिही भाजपमध्ये जाणार नसल्याचे यावेळी प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बाईट - प्रतीक पाटील - नातू वसंतदादा पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री ,काँग्रेस .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.