सांगली - सांगली आटपाडी तालुक्यातल्या बॉम्बेवाडी या ठिकाणी यशवंत मेटकरी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची चोरी ( Pomegranate Theft ) झाल्याची घटना घडली आहे. शेतात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी एका रात्रीत डाळिंब बागेवर डल्ला मारला आहे. तब्बल तीन टन डाळिंब चोरट्यांनी ( Theft of three tons of pomegranates ) पळवल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे.
यशवंत मेटकरी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच या डाळिंबाची विक्रीचा सौदा झाला होता.148 रुपये इतका दर डाळिंबाला मिळाला होता.काही दिवसातच या डाळिंबाची तोडणी होणार होती. मात्र, त्याआधीच चोरट्यांनी मिटकरी यांच्या डाळिंबे बागेवर डल्ला मारून हे डाळिंबाची चोरी केली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये शेतकरी यशवंत मेटकरी यांनी फिर्याद दाखल केली आहे.