सांगली - कुरळप पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 21 गावामधील शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये भेट दिली. यावेळी पोलिसांनी कामकाज, शस्त्र आणि हत्यारांची माहितीही दिली.
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील पोलीस ठाण्यामध्ये जानेवारी महिन्यामधील 2 जानेवारी ते 7 जानेवारी हा पहिला आठवडा पोलीस सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने परिसरातील शालेय विध्यार्थ्यांना कायदा व पोलिसांबद्दलचे गैरसमज व भीती निर्माण न होता कायदा, सुव्यवस्था म्हणजे ते समजवून सांगण्यात आले.
हेही वाचा - मटण दरवाढीला राज्य सरकारच जबाबदार - अण्णासाहेब डांगे
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी विद्यार्थ्यांना शस्त्र कसे चालवतात. पोलीस ठाण्यात कामकाज कसे केले जाते. गुन्ह्याच्या नोंदी कशाप्रकारे घेतल्या जातात. पोलीस परेड कशाप्रकारे घेतले जाते. पोलिसांची पदे कशी असतात. या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना पोलिसांकडून देण्यात आली. यामुळे विध्यार्थ्यांना पोलिसांबद्दलची भीती नाहीशी होऊन आपणही त्यांच्या प्रमाणेच शिक्षण घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार असल्याचे काही विध्यार्थ्यांनी बोलून दाखवले.
हेही वाचा - सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी विविध कार्यकारी सोसायटीला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे