सांगली - पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर कोल्हापूर-सांगली हद्दीवरील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू झाल्याने पोलीस त्याची कडक अमलबजावणी करीत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच प्रवेश किंवा वाहतूक करण्यास परवानगी मिळत आहे.
त्याचप्रमाणे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जोडणारा दुवा म्हणजे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी पुलावर कडक निर्बंध आहे. मात्र अनेक लोक विनाकारण या पुलावरून ये-जा करत आहे. त्यामुळे पुलावर ट्रॉली लावून पोलिसांनी हे पूल बंदिस्त केले आहे. तसेच कणेगाव व ऐतवडे खुर्द या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याठिकाणी केवळ अत्यावश्यक पास व परवानगी असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुले सर्वत्र संचारबंदी आहे.