सांगली- संचारबंदी काळात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका घरावर सांगली पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एकास अटक करत सुगंधी तंबाखू व सुपारी, गुटखा असा एकूण 10 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरामध्ये अवैधरित्या संचारबंदी काळात खुलेआमपणे सुगंधी तंबाखू,सुपारी,गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांनी मिळाली होती.त्यानुसार शहर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन पथकासह शहरातील जामवाडी येथील एका घरावर छापा टाकला.
पोलिसांनी त्याठिकाणी सुगंधी तंबाखू व सुपारी, गुटखा असा एकूण १० लाख २२ हजारांचा मुद्देमाल आढळून हा सर्व मुद्देमाल जप्त करत निखील महादेव सूर्यवंशी या तरुणास या प्रकरणी अटक केली आहे.