डेहराडून Reliance Jewelery Showroom Robbery : रिलायन्स ज्वेलरी शोरूम चोरी प्रकरणात डेहराडून पोलिसांना आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या अनिल सोनी उर्फ डीएसपीला पोलिसांनी हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. सोनी उर्फ डीएसपीवर घटनेपूर्वी त्यानं डेहराडूनमध्ये रेकी केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर अनिल सोनी उर्फ डीएसपी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याती रिलायन्स ज्वेलरी शोरूम दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
रिलायन्स ज्वेलरीवर दरोडा : पोलिसांनी सांगितलं की, जून 2023 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथील रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये काही जणांनी दरोडा टाकला होता. या दरोडा प्रकरणात छोटू राणा उर्फ महाराणा प्रताप, अनिल सोनी उर्फ डीएसपी, अंकुर उर्फ सिकंदर, पंकजसिंग उर्फ चामटकर, रोहितसिंग उर्फ यमराज, सुधीर शर्मा उर्फ डेव्हिड, गणेश उर्फ अण्णा आणि प्रिन्स रा. बिहार यांचा सहभाग होता.
अनिल सोनी डीएसपी बनून गुन्हा केला होता : सांगलीतील रिलायन्स ज्वेलरी शोरूम खूप मोठं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांचं अनेक कर्मचारी वेगवेगळ्या काउंटरवर कामाला आहेत. तसंच, अनेकांनी शोरूमसमोर हातगाड्या उभ्या केल्यानं हातगाड्यावाले पोलिसांना फोन करतील, अशी भीती वाटत होती. शोरूमजवळ एसपी ऑफिस, पोलिस चौकी होती. त्यामुळंच गुन्हेगारांनी गुन्हा करण्याचा नवा मार्ग शोधला.
पोलिसाच्या वेशात टाकला दरोडा : त्यानंतर गुन्हेगार सुबोध सिंगनं पोलिसाच्या वेशात रिलायन्सच्या शोरूममध्ये प्रवेश करण्याची आइडिया दिली होती. आरोपीच्या नियोजनानुसार शोरूमच्या सर्व कर्मचाऱ्यांना काही घटना सांगून एका ठिकाणी जमा करायचं होतं. ज्यामध्ये अनिल सोनीनं बनावट डीएसपीची भूमिका साकारली होती. सुधीर शर्मा उर्फ डेव्हिडनं बनावट एसआयची भूमिका केली होती. अशा प्रकारे या टोळीने महाराष्ट्रातील सांगली येथील रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोडा टाकला होता.
12 आरोपींना अटक : डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितलं की, डेहराडून रिलायन्स ज्वेलरी शोरूम चोरी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. पोलिस अजूनही आरोपी सोनीची माहिती गोळा करत आहेत. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात येत आहे.
हेही वाचा -