ETV Bharat / state

धक्कादायक! सांगलीच्या बाजारात चक्क प्लास्टिकची अंडी; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई - shop

शिजलेली अंडी कधीही पाण्यावर तरंगत नाहीत किंवा पाण्याला फेस येत नाही. त्यामुळे साठे घाबरल्या आणि त्यांनी पतीला ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर साठे यांनी आपल्या काही मित्रांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी ५ अंडी आणली आणि त्यातील चार अंडी शिजवून पहिली. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडला.

सांगलीच्या बाजारात प्लॅस्टिकची अंडी
author img

By

Published : Jun 5, 2019, 7:57 PM IST

सांगली - प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची चर्चा काही महिन्यापासून सुरू असतानाच सांगलीच्या बाजारात नकली अंडी सापडली आहेत. त्यामुळे नकली अंड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधगावमध्ये एका दुकानात ही अंडी आढळली असून या प्रकरणी अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून प्लास्टिकची सर्व अंडी ताब्यात घेतली आहेत.

सांगलीच्या बुधगावमधील युवराज साठे यांनी रात्रीच्या जेवणासाठी अंड्यांचा बेत आखला होता. यासाठी त्यांच्या लहान मुलाने गल्लीतीलच भाकरे किराणा स्टोअर्समधून ६ अंडी विकत आणली होती. त्यानंतर साठे यांच्या पत्नीने ती अंडी शिजवण्यासाठी पातेल्यात टाकून गॅसवर ठेवली. काही वेळातच पाणी गरम झाले आणि त्यामधील अंडी फुटून पाण्यावरती तरंगू लागली आणि त्या पाण्याला पांढरा फेस येऊ लागला.

सांगलीच्या बाजारात प्लास्टिकची अंडी

शिजलेली अंडी कधीही पाण्यावर तरंगत नाहीत किंवा पाण्याला फेस येत नाही. त्यामुळे साठे घाबरल्या आणि त्यांनी पतीला ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर साठे यांनी आपल्या काही मित्रांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी पाच अंडी आणली आणि त्यातील चार अंडी शिजवून पहिली. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडला. पाणी जसे गरम होईल, तशी अंडी फुटू लागली आणि पाण्यावरती तरंगू लागली. त्यानंतर पाण्यातून अंडे बाहेर काढून त्याचे कवच जाळले असता, ते प्लास्टिकसारखे जळू लागले आणि त्याचा वास देखील येऊ लागला.
त्यानंतर साठे यांनी एक कच्चे अंडे फोडून वाटीमध्ये ओतले असता, त्याच्या आतील पांढरा आणि पिवळा बलक वाटीमध्ये एकरूप झाला. वास्तविक खऱ्या अंड्यामध्ये तसे होत नाही. या बाबत भाकरे किराणा स्टोअर्सच्या मालकास विचारणा केली. त्यावर आपण ही अंडी एका विक्रेत्याकडून आणल्याचे सांगितले. याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करत ही अंडी नकली व बनावट असल्याचा दावा साठे यांनी केला आहे. यानंतर अन्न औषध प्रशासनाने बुधगावमधील दुकानदार भाकरे यांच्या घरातील अंड्याची तपासणी करत अंड्याच्या साठा ताब्यात घेतला आहे. त्यानंतर ही अंडी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, या प्रकारामुळे नकली अंड्यांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून तपासणीनंतर हे सर्व अंडी खरेच नकली आहेत का? हे समोर येणार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Avb

Feed send file name - MH_SNG_NAKLI_ANDI_05_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_NAKLI_ANDI_05_JUNE_2019_VIS_5_7203751

स्लग - सांगलीच्या बाजारात प्लॅस्टिकची अंडी ! ..

अँकर - प्लॅस्टिकची अंडी बाजारात आल्याची चर्चा काही महिन्यापासून सुरू आसताना सांगली मध्ये नकली अंडी सापडली आहेत.त्यामुळे नकली अंडी सापडल्याने नकली अंड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बुधगाव मध्ये एका घरात ही अंडी आढळली असून या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने सर्व अंडी ताब्यात घेतली आहेत .Body:व्ही वो - सांगलीच्या बुधगाव मधील युवराज साठे रात्रीच्या जेवणासाठी अंड्यांचा बेत आखला होता.यासाठी त्यांच्या लहान मुलाने गल्लीतीलच भाकरे किराणा स्टोअर्समधून सहा अंडी विकत आणली,आणि साठे यांच्या पत्नींनी पातेल्यात पाणी घालूनती अंडी शिजवण्यासाठी गॅसवर्ती ठेवली.काही वेळातच पाणी गरम झाले आणि त्या मधील अंडी फुटूण पाण्यावरती तरंगू लागली.तर पाण्यला पांढरा फेस येऊ लागला.तर शिजलेली अंडी कधीही तरंगत नाहीत किवा पाण्याला फेस येत नाही.त्यामुळे साठे या घाबरल्या आणि त्यांनी आपल्या पतीला सदरची बाब लक्षात आणून दिली.यानंतर साठे यांनी आपल्या काही मित्रांना हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी पाच अंडी आणून चार अंडी शिजुवून पहिली असता, पुन्हा तोच प्रकार घडला .पाणी जशे गरम होतील, तशी अंडी फुटू लागली आणि पाण्यावरती तरंगू लागली. तर अंडी पातेल्यातून बाहेर काढले असता त्या अंड्यावरचे पांढरे कवच जाळले असता प्ल्यास्टिक सारखे जळून त्याचा वास देखील प्ल्यास्टिक सारखा येत होता. तर यामधील मधील एक कच्चे अंडे फोडून वाटी मध्ये ओतले असता त्याच्या आतील पांढरा आणि पिवळा बलक वाटी मधे एकरूप झाला. वास्तविक खऱ्या अंड्या मध्ये होत नाही. या बाबत भाकरे किराणा स्टोअर्सच्या मालकास विचारणा केली असता आपण एका अंडे विक्रेत्याकडून आणल्याचे सांगितले.आणि याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करत सदरची अंडी नकली व बनावट असल्याचा दावा साठे यांनी केला आहे.यानंतर अन्न औषध प्रशासनाने बुधगाव मधील मकानदार यांच्या घरातील अंड्याची तपासणी करत अंड्याच्या साठा ताब्यात घेतले आहेत.तर ही अंडी तपासणीसाठी प्रयोगशाळे कडे पाठवण्यात येणार आहे.

मात्र या प्रकारामुळे नकली अंड्यांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून तपासणी नंतर हा सर्व अंडी खरंच नकली आहेत का हे समोर येणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.