सांगली - राज्याचे नवनिर्वाचीत कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मतदारसंघ पलूसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीने फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..
पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी व सहकार राज्यमंत्री मधून निवड झाली आहे. त्यांची निवड झाल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच ते त्यांच्या मतदारसंघांत दाखल झाले.यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबी द्वारे फुलांचा वर्षाव करत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती.