सांगली - तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या बार्ज पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाने 17 मे रोजी सुरू केलेली मोहीम अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या बार्जवरील निखिल सुपनेकर यांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारून १९ तास मृत्यूशी झुंज दिल्याचा अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव...
...आणि बोटीत पाणी शिरले -
निखिल कैलास सुपनेकर रा. काळमवाडी ता. वाळवा हा सात महिन्यांपासून मुबंई येथील मॅथ्यू अस्फोटेक या कंपनीमध्ये टँकर वेल्डर म्हणून कार्यरत आहे. मागील पाच दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह सर्वत्र धुमाकूळ घातला. हे वादळ सोमवार दि 17 रोजी सकाळी सात वाजता मुंबई येथील हिराफिल्ड एच.टी. प्लँटफॉर्मवर धडकले आणि अचानक बारा मीटर उंचीच्या लाटा सुरु झाल्याने बार्ज पी 305 ही सर्वात हेवी असणाऱ्या बोटीचे साईटचे अँकर तुटून ती ओ. एन.जी.शी. प्लॅटफॉर्मला जाऊन धडकली. त्यामुळे बोट क्रॅक झाल्याने बोटीत पाणी शिरले.
आणि सुरु झाला सर्वांचा थरार -
या बोटीमध्ये एकूण तीनशे लोक होते. दिवसभर वादळ कमी होण्याची वाट बघत सर्वजण बोट पकडून उभे होते. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान बोट बुडण्यास सुरूवात झाली. ज्यांना पोहता येत होते, त्यांनी उड्या मारल्या तर काही जण बोटीबरोबर पाण्यात बुडाले. मात्र या उडी मारण्यामध्ये निलेश सुपनेकर हा 25 वर्षीय युवक ही होता.
जीव वाचवण्यासाठी १९ तास पाण्यात झुंज -
चक्रीवादळामुळे समुद्रात उंच उंच लाटा दिसत होत्या. या वादळात आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नाने समुद्रात १९ तास पाण्यात झुंज देत होता. दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. १८ रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान हेलिकॉप्टरमधून शोध घेऊन एअरफोर्सच्या जवानांनी मला पाहिले. आणि गुजरात बॉण्ड्रीवरील रेस्क्यू बोटच्या गरम रूममध्ये अठरा तास ठेवण्यात आले. व बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुंबईला आणण्यात आले. एक रात्र रुग्णालयात ठेऊन शुक्रवारी दि. 21 रोजी काळामवाडी येथील त्याच्या घरी सोडले.
कंपनीमध्ये वेल्डर म्हणून आहे पदावर -
निखिल कैलास रूपनेकर हा सामान्य कुटुंबातील असून आयटीआयमधून वेल्डरचा कोर्स झाल्याने त्याला सात महिण्यापुर्वी मुंबई मधील मॅथ्यू अस्फोटेक या कंपनीमध्ये वेल्डर या पदावर काम मिळाले होते. या बोटीमध्ये तो वेल्डिंगचे काम करत होता. घरी आई, वडील, एक भाऊ व लहान बहिण असा परिवार आहे.
बहिण तेजलची धाडसीवृत्ती -
ज्यादिवशी हा प्रकार घडला त्यादिवशी निखिल याची लहान बहिण तेजल ही सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत होती. व्हिडीओच्या माध्यमातून तीला आपला भाऊ कामाला असलेले बार्ज पी 305 बुडाल्याचा व्हिडीओ दिसला. ती बाब तीने आपल्या घरी वयस्कर आईवडीलांना न सांगता साखराळे येथील मावशी व काकांना सांगितली. काकांनी येऊन फोनवरून ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर निखिल अजून सापडला नसल्याचे सापडला कि कळवतो असे सांगितले. तोपर्यंत तेजलने ही बाब घरी कोणाला कळू दिली नाही. यावरून तेजलचा जबाबदारपणा व धाडसीवृत्ती दिसून येते.
कंपनीच्या बेजबाबदारीमुळे हा प्रकार -
शासनानने धोक्याचा इशारा दिला असताना सुद्धा कंपनीतील अधिकाऱ्यांनी काय होणार नाही असे सांगत काम चालू ठेवले व त्यांच्या बेजबाबदारीमुळे हा प्रकार घडल्याचे निखिल याने Etv शी बोलताना सांगितले..