सांगली - शहरात एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप राजू हंकारे (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगली शहरातील काळी खण याठिकाणी ही खुणाची घटना घडली आहे.
घटनास्थळी काही अंतरावर 3 मोठी दगडं आढळून आली आहेत, तर प्रदीप यांची दुचाकी काही अंतरावर सापडली आहे. मंगळवारी सकाळी प्रदिप हा घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्रीच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या कोणत्या करणातून झाली आहे, हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. तर दिवाळीच्या तोंडावर शहरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.