ETV Bharat / state

world environment day मुक्तांगणातील विद्यार्थ्यांनी बनवले तब्बल पाच हजार सीड बॉल - बीजरोपण

आतापर्यंत तब्बल १६ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. यंदा पर्यावरण दिनाचे (world environment day) औचित्य साधून तब्बल पाच हजार सीड बॉल बनवण्यात आले आहेत. वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान मुलांच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत. हे बॉल पावसाने फुटून बियांना अंकुर येईल आणि त्याचे रोपांतून झाडात रुपांतर होईल. अशी ही संकल्पना असल्याचे मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते यांनी सांगितले.

Muktangan made five thousand seed balls in sangli
मुक्तांगणने पर्यावरण दिनी बनवले तब्बल पाच हजार सीड बॉल
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:40 AM IST

Updated : Jun 5, 2021, 12:41 PM IST

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना ऑक्सिजनचे (world environment day) महत्त्व पटू लागले आहे. वातावरणात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे बनले आहे. वाळवा तालुक्यातील इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी गेली पाच वर्षे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत तब्बल १६ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. यंदा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तब्बल पाच हजार सीड बॉल बनवण्यात आले आहेत. पावसाळ्यात हे बॉल निसर्गाच्या कुशीत टाकले जाणार आहेत. मुक्तांगणने पर्यावरणप्रेमींमध्ये आदर्श निर्माण केला आहे.

मुक्तांगणने पर्यावरण दिनी बनवले तब्बल पाच हजार सीड बॉल

कोरोना काळात पालकांनी केला उपक्रम -

५ जूनला सर्वत्र पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामजिक बांधिलकी म्हणून सीड बॉल बनविण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले. चिखलाचे बॉल करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया घातल्या. गेल्या चार दिवसांपासून मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात हा उपक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे स्कूल बंद आहेत. त्यामुळे काही पालकांनी एकत्रित हे सीड बॉल बनविले. दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध डोंगरावर हे सीड बॉल फेकण्यात येत आहेत.

सीड बॉल बनविण्यासाठी मुले उत्साहाने सहभागी -

चिंचोके, जांभूळ, पपई, फणस, बहावा, गुलमोहर, रानटी बाभूळ आदी झाडांच्या बिया त्यांनी आणल्या होत्या. लहान मुले, महिला, पालक सीड बॉल बनविण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. या मुलांनी माती आणि शेण सम प्रमाणात घेऊन एकजीव केले. त्यात विविध देशी झाडांच्या बिया घालून छोट्या बॉलसारखे गोळे तयार करण्यात आले. वर्षाराणी मोहिते यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

बॉल फुटून बियांना अंकुर येईल -

वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान मुलांच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत. हे बॉल पावसाने फुटून बियांना अंकुर येईल आणि त्याचे रोपांतून झाडात रुपांतर होईल. अशी ही संकल्पना असल्याचे मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते यांनी सांगितले.

वर्षभर मुलांसाठी पर्यावरणाबाबत अनेक उपक्रम -

निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने कृतीशील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुक्तांगणमध्ये लहान मुलांना प्रत्यक्ष अनुभव देत शिक्षण दिले जाते. पर्यावरण, निसर्गाच्या सानिध्यात मुले चांगली रमतात. यामुळेच लहानपणीच पर्यावरणाच्या रक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. वर्षभर पर्यावरणाच्या बाबत अनेक उपक्रम घेऊन मुलांच्या जडणघडणीत नवनव्या गोष्टी बिबवल्या जातात. या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहकार्य केले. पावसाळ्यात हे बॉल विविध ठिकाणी फेकून दिल्यावर बियांचे रोपण होईल अन् वृक्ष वाढतील अशी भूमिका आहे.

पर्यावरण दिन विशेष : पेट्रोल डिझेलला बाय-बाय, आता बॅटरीवर चालणाऱ्या सायकलला करा 'हाय'

Last Updated : Jun 5, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.