ETV Bharat / state

अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण करा, अन्यथा..पडळकरांचा इशारा - MLA Gopichand Padalkar warning

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा 1 वर्षापासून अनावरणाच्या प्रतिक्षेत आहे. सरकारकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

MLA Gopichand Padalkar
आमदार गोपीचंद पडळकर इशारा
author img

By

Published : Feb 2, 2021, 7:19 PM IST

सांगली - हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा 1 वर्षापासून अनावरणाच्या प्रतिक्षेत आहे. सरकारकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच, येत्या पंधरा दिवसात राज्य सरकारने पुतळ्याचे अनावरण करावे, अन्यथा होळकरांच्या वंशजांना घेऊन पुतळ्याचे अनावरण करू, असा इशारा पडळकर यांनी दिला.

माहिती देताना आमदार गोपीचंद पडळकर

हेही वाचा - पालघरमध्ये 11 चिमुकल्यांना विषबाधा, उपचार सुरू

एक वर्षापासून अनावरणाच्या प्रतिक्षेत..

आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी औंढा नागनाथ या ठिकाणी भेट दिली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा गेल्या वर्षभरापासून प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याची बाब पडळकर यांच्या निदर्शनास आली. यावरून पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला.

अहिल्यादेवी होळकरांनी केला औंढा नागनाथ मंदिराचा जिर्णोद्धार..

सांगलीच्या झरे या ठिकाणी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, १२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ मंदिर आहे. आणि या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. हा इतिहास आहे, त्यामुळे या मंदिराच्या ट्रस्टच्यावतीने प्रवेशद्वारावर अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय झाला. एक वर्षापूर्वी तो पुतळा त्या ठिकाणी आणला गेला, मात्र तो अनावरणाच्या प्रतिक्षेत आहे. आणि आज हिंगोली दौऱ्यावेळी ही बाब निदर्शनास आली. पुतळा गुंडाळलेल्या अवस्थेत प्लास्टिकमध्ये आढळून आला आहे. केवळ अनावरणाच्या प्रतिक्षेत हा पुतळा असल्याची बाब समोर आली. हे अत्यंत खेदाची बाब आहे, असे पडळकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा आग्रह..

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे, अशी स्थानिक आमदारांच्या भावनेमुळे हे अनावरण अद्याप होऊ शकले नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यास आमचा विरोध नाही, मात्र ठाकरे यांना विनंती आहे की, येत्या 15 दिवसात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत भूमिका घ्यावी. असे न केल्यास महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज हा एकत्र येऊन होळकरांचे वारसा असणारे भूषणसिंह होळकर यांच्याहस्ते पुतळ्याचे अनावरण करतील, असा इशारा पडळकर यांनी दिला.

हेही वाचा - आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी,अन्यथा उद्रेक होईल, मराठा क्रांती मोर्चाचा जनआक्रोशी इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.