सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या ( Hirabai Padalkar Won Sarpanch Gram panchayat Election ) निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर ( Padalkarwadi Gram Panchayat Election ) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. 7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत, तर सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत. या विजयानंतर आटपाडीमध्ये जल्लोष करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेच्या कट्टर समर्थकाचे पडळकरांना आव्हान आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या पडळकरवाडी ग्रामपंचायत ( Gram panchayat Election ) सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या. सुरुवातीला या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी पडळकर यांचे कट्टर विरोधक असणारे तानाजी पाटील यांनी आपला उमेदवार दिला होता. तानाजी पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) गटाचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवार उभा करुन पडळकर यांना तगडे आव्हान दिले होते. कमलाबाई गोरड या ठिकाणी हिराबाई पडळकर ( Hirabai Padalkar Won Sarpanch Gram panchayat Election ) यांच्या विरोधात होत्या. अत्यंत चुरशीने या ठिकाणी मतदान झाले होते. यामध्ये आज पार पडलेल्या मतमोजणीत हिराबाई पडळकर या तीनशेहुन अधिक मतांनी विजयी झालेल्या आहेत. त्याचबरोबर पडळकरवाडीच्या ग्रामपंचायतीवरील गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.
एक मुलगा आमदार, दुसरा जिल्हा परिषद सदस्य तर आई सरपंच गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) हे भाजपचे आमदार आहेत, तर त्यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर हे सांगली जिल्हा परिषदेचे ( Zilla Parishad Sangli ) सदस्य आहेत. आता त्यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर ( Hirabai Padalkar Won Sarpanch Gram panchayat Election ) या पडळकरवाडीच्या सरपंच बनल्या आहेत. त्यामुळे आता पडळकर यांच्या मातोश्री पडळकरवाडीचा कारभार पाहणार आहेत.