ETV Bharat / state

बाप्पांसमोर अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा; तर उपअधीक्षकांचा पंजाबी तडका - फुगडीचा फेरा

मिरजेच्या ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने होत असते. त्यामुळे मिरजेतील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन अंतिम टप्प्यात असताना मिरजेत पोलिसांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग यांनी पंजाबी तडक्यावर ठेका धरला होता.
author img

By

Published : Sep 13, 2019, 4:39 PM IST

Updated : Sep 13, 2019, 5:01 PM IST

सांगली - तब्बल 30 तास चाललेल्या मिरजेच्या गणेश विसर्जन मिरवणुकांची सांगता मिरज पोलिसांच्या गणेश मूर्तीने झाली. यावेळी चक्क अप्पर पोलीस अधीक्षकांनी बाप्पासमोर फुगडीचा फेर, तर पोलीस उपाधीक्षक यांनी पंजाबी ठेका धरला. मग पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहभागी होत मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला.

मिरजेच्या ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने झाली.

हेही वाचा - लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरजेत भक्तांचा महापूर

मिरजेच्या ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने होत असते. त्यामुळे मिरजेतील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन अंतिम टप्प्यात असताना मिरजेत पोलिसांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डूबुल, मिरज पोलीस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी झिम्मा फुगडीचा फेरा धरला. तर यांनंतर पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग यांनी पंजाबी तडक्यावर ठेका धरला आणि मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पारंपारिक वाद्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत मनसोक्त थिरकले.

हेही वाचा - सांगली : मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

मागील 11 दिवस गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण सहन करत शांततेत गणेशोत्सव पार पडल्याचा आनंदही यावेळी पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पोलिसांनी देखील मोठा जल्लोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोपही दिला आहे.

हेही वाचा - ब्रम्हनाळ दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे - राजू शेट्टी

Intro:
File name - mh_sng_01_police_dance_on_ganesh_visarjan_vis_01_7203751 - to -
mh_sng_01_police_dance_on_ganesh_visarjan_vis_06_7203751

स्लग - अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा,तर उपअधीक्षकांचा पंजाबी तडका आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ठेकयाने ऐतिहासिक गणेश विसर्जनाची सांगता..

अँकर - तब्बल 30 तास चाललेल्या मिरजेच्या गणेश विसर्जन मिरवणूकांची सांगता मिरज पोलिसांच्या गणेश मूर्तीने झाली.यावेळी यावेळी चक्क अप्पर पोलीस अधीक्षका यांनी बापांच्या समोर फुगडीचा फेर तर पोलीस उपाधीक्षक यांनी पंजाबी ठेका धरला आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही मग सहभागी होत मोठ्या जल्लोषात विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला आहे.Body:गेली 30 तास सुरू असणाऱ्या मिरजेच्या ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने होत असते,त्यामुळे मिरजेतील सर्व गणेश मूर्त्यांचे विसर्जन अंतिम टप्प्यात असताना मिरजेत पोलिसांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत अप्पर पोलीस अधीक्षका मनीषा डूबुल ,मिरज पोलीस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी झिम्मा फुगडीचा फेरा धरला,तर यांनंतर पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग यांनी पंजाबी तडक्यावर ठेका धरला,आणि मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पारंपारिक वाद्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत मनसोक्त थिरकले.
गेली 11 दिवस गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण सहन करत शांततेत गणेशोत्सव पार पडल्याचा आनंदही यावेळी पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि मोठी जल्लोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोपही दिला आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.