ETV Bharat / state

'मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरू', सांगलीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक - maratha kranti morcha news

मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी न्यायालयात कणखर भूमिका मांडावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरेल,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मागील सरकारने केलेल्या चुका विद्यमान सरकारने करू नये, असा सल्ला देखील देण्यात आलाय.

maratha kranti morcha
न्यायालयात मराठा आरक्षण टिकणारी भूमिका मांडण्याचा आग्रह मराठा क्रांती मोर्चा मार्फत करण्यात आला.
author img

By

Published : Jun 30, 2020, 5:47 PM IST

सांगली - मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी न्यायालयात कणखर भूमिका मांडावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरेल,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मागील सरकारने केलेल्या चुका विद्यमान सरकारने करू नये, असा सल्ला देखील देण्यात आलाय.

न्यायालयात मराठा आरक्षण टिकणारी भूमिका मांडण्याचा आग्रह मराठा क्रांती मोर्चा मार्फत करण्यात आला.

७ जुलै रोजी मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ताकतीने आपली भूमिका मांडवी, अशी मागणी आज सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाने केली. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मागील सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारकडून मराठा आरक्षण आणि समाजाला देण्यात आलेल्या सवलतींमध्ये अनेक चुका झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे आता न्यायालयात मराठा आरक्षण टिकणारी भूमिका मांडण्याचा आग्रह क्रांती मोर्चा मार्फत करण्यात आला.

आरक्षण देण्यामध्ये कोणत्याही राजकीय विरोधकांनी कुरघोडी न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे. मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग निर्मितीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सध्या कार्यरत आहे. मात्र याला जास्तीचा निधी देऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकराने प्रयत्न करावे यासंदर्भात मागणी करण्यात आली.

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गुन्हे दाखल झाले होते. ते मागे घेण्यात यावे, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.