ETV Bharat / state

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील बिनविरोध

author img

By

Published : Dec 7, 2021, 2:59 AM IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( Sangli DCC Bank ) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी (दि. 6) बिनविरोध पार पडल्या आहेत. शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( Sangli DCC Bank ) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी (दि. 6) बिनविरोध पार पडल्या आहेत. शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली होती. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत झाली होती.

बोलताना मानसिंगराव नाईक

राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक ...

ज्यामध्ये महाविकास आघाडीने 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला तर भाजपाला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीमध्ये 17 जागांपैकी 9 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे तर काँग्रेसला 4 आणि शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्याने अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा दावा होता. त्यानुसार अध्यक्ष पद राष्ट्रवादी आणि उपाध्यक्ष पद काँग्रेसकडे, असा फर्म्युला ठरला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या आदेशानुसार या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. अध्यक्षपदासाठी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील हे देखील इच्छुक होते. मात्र, जयंत पाटील यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे.

30 वर्षांनंतर शिराळ्याला अध्यक्षपद ...

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदाचा बहुमान तब्बल 30 वर्षानंतर शिराळा विभागाला मिळाला आहे. तसेच अध्यक्षपदाचा कारभार करत असताना बँकेचा नावलौकिक वाढवण्याबरोबर काटकसरीने नियोजन करणे याला प्राधान्य राहिल. तसेच पारदर्शी आणि शेतकऱ्यांना अभिप्रेत असणारे काम व तरुणांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने कारभार असेल, असा विश्वास नुतन अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा - अवकाळीचा कहर.. सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 हजारहून अधिक द्राक्षबागा उद्ध्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.