ETV Bharat / state

Best Out Of Waste In Sangli : असाही भन्नाट जुगाड... दुचाकी आणि भंगारातुन बनवली चारचाकी टुमदार गाडी - सांगलीत बनवली नॅनोपेक्षाही जुनी गाडी

कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगार आणि दुचाकी साहित्याचा जुगाड करत चार चाकी गाडीची निर्मिती (Four Wheeler made from scratch) केली आहे. ही चारचाकी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Four wheeler
चारचाकी गाडी
author img

By

Published : Dec 20, 2021, 4:23 PM IST

Updated : Dec 22, 2021, 3:42 PM IST

सांगली - भंगार आणि दुचाकी साहित्याचा जुगाड करत एका अवलियाने चक्क चार चाकी गाडीची निर्मिती (Four Wheeler made from scratch) केली आहे. अगदी ऐटीत बसून जाण्यासारखी ही भन्नाट गाडी रस्त्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दुचाकीचा इंजन आणि जीप गाडीचा ढाचा, असा अफलातून प्रयोग करून ही चारचाकी गाडी कडेगावच्या देवराष्ट्र येथील दत्तात्रय लोहार या अवलियाने बनवली आहे.

मुलाची इच्छेमुळे मिळाली प्रेरणा

आज प्रत्येकाला आपल्याकडे चार चाकी गाडी असावं असे वाटते. अशीच काहीशी इच्छा कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांच्या मुलाची होती. लोहार यांची परिस्थिती मात्र बेताची, एक एकर शेती आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय, त्यामुळे त्यांना नवी गाडी किंवा जुनी गाडी घेणे ही अशक्य आहे. पण मुलाची इच्छा की आपल्याकडे चार चाकी गाडी पाहिजे.

स्क्रॅप मटेरिअलपासून बनवलेली चारचाकी टुमदार गाडी

दोन वर्षांपासून सुरू होता प्रयोग

दत्तात्रय लोहार यांचा जो व्यवसाय आहे,त्या फॅब्रिकेशनच्या माध्यमातून चार चाकी गाडी कशी बनवता येईल,याच्यावर विचार सुरू झाला.आणि आपल्याकडे असणाऱ्या एका दुचाकी वाहनाचे चारचाकी वाहनात कसे रूपांतर करता येईल,या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी मग त्यांनी हळूहळू भंगारातील साहित्य गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीचे इंजिन भंगारातील एका जीप गाडीचे साहित्य, रिक्षाचे चाक,त्याचबरोबर इतर साहित्य गोळा करून सर्व जुगाड करत दत्तात्रय लोहार यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर एक भन्नाट चार चाकी गाडी तयार केली आहे. छोटीशी आणि टुमदार असणारी ही गाडी आता रस्त्यावर धावू लागली आहे.

नॅनो पेक्षा छोटी

दिसायला अगदी एखाद्या विंटेज (ओल्ड मॉडेल) प्रमाणे ही गाडी दिसते. नॅनो गाडी पेक्षा ही लोहार यांनी बनवलेली गाडी अगदी छोटी आहे. स्वतःच्या कल्पक डोक्याचा वापर करत दत्तात्रय लोहार यांनी ही चार व्यक्ती बसू शकतील अशी, गाडी बनवली आहे.विशेष म्हणजे या गाडील स्टार्टर नसून पायाने किक मारून चालू होते. याचे स्टेरींग हे डाव्या बाजूला आहे. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते.तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे.

जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही
आता ही गाडी दत्तात्रय लोहार घेऊन आपल्या कुटुंबासमवेत फिरत आहेत. आणि रस्त्यावरून जाताना ही गाडी पाहून सगळेजण आश्चर्य तर व्यक्त करतात. शिवाय दत्तात्रेय लोहार यांच्या या कल्पक बुद्धीलाही सलाम करतात. लोहार यांचा फारसं शिक्षण झालं नाही किंवा कोणतेही पदवी त्यांनी घेतली नाही.पण आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली ही चार चाकी जुगाड गाडी सर्वांचं लक्ष वेधून घेतेच. शिवाय इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही,हे दाखवून देते.

हेही वाचा - Manora Nagar Panchayat Election 2021 : मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या मतदान

Last Updated : Dec 22, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.