सांगली - पाच राज्याच्या निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच आता गॅस दरवाढीविरोधात सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. कृष्णा नदीत गॅस सिलिंडर अर्पण करत मदनभाऊ पाटील युवा मंचाच्यावतीने केंद्र सरकार आणि गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला ( Sangli Agitation Against Gas Price Rises ) आहे.
गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन -केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याविरोधात संपूर्ण देशभरात संताप व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने सांगली मध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
कृष्णामाईला गॅस सिलिंडर अर्पण - शहरातील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सिलिंडर अर्पण करण्यात आले. तसेच, कृष्णा नदीच्या पाण्यात गॅस सिलिंडर बुडवून दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने अन्यायकारक असणारी गॅस दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - SC On Anil Deshmukh Case : सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका; अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय करणार