सांगली - लग्नाला विरोध होत असल्याने प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पलूसमध्ये घडला आहे. एका लॉजमध्ये दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत घोरपडे (वय २४) व प्राजक्ता माने (वय २२) अशी त्या दोघांची नावे आहेत.
दोघेही पलूस जवळच्या कुंडल या गावाचे रहिवासी आहेत. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघांच्याही घरच्या मंडळींकडून लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघांनी पलूसमधील सातारा रोडवरील एका लॉजमध्ये जाऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.