सांगली - तासगाव येथील एका कोल्ड स्टोअरेजला भीषण आग लागली आहे. या आगीत स्टोरेजमधील बेदाण्यांसह लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली आहे.
भीषण आगीत कोल्ड स्टोरेज जळून खाक
तासगाव-सांगली रोडवरील वासुंबे गावच्या हद्दीत असलेल्या श्रीकृपा अॅग्रोटेक कोल्ड स्टोरेजला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत कोल्ड स्टोरेज जळून खाक झाले आहे. स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलेला बेदाणा आणि कोल्ड स्टोरेजचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळाले आहे. आगीचे वृत्त समजताच तासगाव नगरपरिषद अग्निशामक दलाच्या दोन अग्निशामक गाड्यासह पथकाने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणातून लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तासगाव पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली, असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.