ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी 38 फुटांवर; पूर पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू

author img

By

Published : Aug 18, 2020, 10:23 AM IST

Updated : Aug 18, 2020, 10:40 AM IST

धरणक्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळी 9 वाजता कृष्णा नदीने 38 फुटांची पातळी ओलांडली आहे, तर पूर पट्ट्यातील शेकडो घरात नदीचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 200हून अधिक कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केले आहे.

flood in sangli
धरणक्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सांगली - धरणक्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळी 9 वाजता कृष्णा नदीने 38 फुटांची पातळी ओलांडली आहे, तर पूर पट्ट्यातील शेकडो घरांत नदीचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 200हून अधिक कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केले आहे.

कृष्णेची पाणी पातळी 38 फुटांवर; पूर पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू
गेल्या 3 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. तसेच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी वाढली आहे. सोमवारी पावसाचा जोर मंदावल्याने पातळीतील वाढ काही अंशी कमी झाली आहे. मात्र, पुराचा धोका अद्याप कायम आहे.
flood in sangli
पूर पट्ट्यातील शेकडो घरांत नदीचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोयना धरणातून 56 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ही सकाळी 38 फूट झाली आहे. पाणी वाढल्याने सांगलीच्या औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले असून शहरातील पूर पट्ट्यातील बाजारात कृष्णेचे पाणी शिरले. यामध्ये आज वाढ होऊन सुमारे 100हून अधिक घरांमध्ये पाणी घुसल्याचे समोर आले आहे.

स्थानिकांना सोमवारपासून स्थलांतरित करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे सुमारे 200 हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले असून वाढती पातळी व गतवर्षीच्या महापूराचा अनुभव लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांचे मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू आहे.

कृष्णेची इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट आहे. सध्या सकाळी 9 वाजता नदीने आयर्विन पूल याठिकाणी 38 फुटांची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे कृष्णा नदीच्या काठी असणारे दोन्ही घाट हे पाण्याखाली गेले आहे. अमर धाम स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. तर पूर पट्ट्यातील सुर्यवंशी प्लॉट,काका नगर ,कर्नाळ रोड,साईनाथ कॉलनी याभागात पुराचे पाणी शिरले आहे.

प्रशासनाने पूर स्थिती लक्षात घेऊन सर्व आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवली असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

Last Updated : Aug 18, 2020, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.