ETV Bharat / state

सांगलीत 'कृष्णा'ने ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर - चांदोली

सांगलीमध्ये आयर्विन पूल या ठिकाणी कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 9:30 वाजता 40.8 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे, सखल भागात असणाऱ्या दत्तनगर, काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट येथील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. येथील 20 ते 25 कुटुंबांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

krishna river overflowed in sangli families living at the edge of river have been shifted
author img

By

Published : Aug 4, 2019, 10:59 AM IST

Updated : Aug 4, 2019, 11:13 AM IST

सांगली - कृष्णा, कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्याप सुरूच आहे. तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

सांगलीत 'कृष्णा'ने ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर

सांगलीमध्ये आयर्विन पूल या ठिकाणी कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 9:30 वाजता 40.8 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे, सखल भागात असणाऱ्या दत्तनगर, काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट येथील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. येथील 20 ते 25 कुटुंबांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिलवडी-अंकलखोप मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर, भिलवडीच्या बाजारपेठेमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या ठिकाणी असणाऱ्या मौलानानगर आणि वसंतदादानगर येथील सुमारे 50 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

औदुंबर मधील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. तर वाळवा तालुक्यातील ताकारी येथील पूल कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळी मुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ताकारी-बोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मिरज तालुक्यातील ढवळी येथे सुमारे पंधरा घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे, तर इथल्या ढवळी आणि म्हैसाळ गावांचा संपर्क तुटला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Av

File name - mh_sng_01_krushna_pur_patli_vis_01_7203751 - mh_sng_01_krushna_pur_patli_vis_02_7203751

स्लग - सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी,धोका पातळीकडे वाटचाल सुरू. पूल,बंधारे पाण्याखाली..नदी काठच्या शेकडो कुटुंबांचे स्थलांतर ...

अँकर - सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 40.8 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे. यामुळे सांगलीला पुराचा धोका वाढलाय.
तर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे.कृष्णा नदीची पातळी वाढत असल्याने धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आसल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Body:कृष्णा कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्याप सुरूच आहे.तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळी मुळे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे भिलवडी अंकलखोप मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे तर भिलवडी च्या बाजारपेठ मध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे या ठिकाणी असणाऱ्या मौलाना नगर वसंतदादानगर येथील सुमारे 50 कुटुंबांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. औदुंबर मधील दत्त मंदिर पाण्याखाली गेला आहे.तर वाळवा तालुक्यातील ताकारी येथील पूल कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळी मुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.त्यामुळे ताकारी- बोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.मिरज तालुक्यातील ढवळी येथे सुमारे पंधरा घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय,या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे,तर इथला ढवळी आणि म्हैसाळ गावचा नजीकचा संपर्क तुटला आहे.

तर सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.आयर्विन पूल या ठिकाणी कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 9 .30 वाजता 40.8 फुटांवर पोहोचली आहे.त्यामुळे सखल भागातील असणाऱ्या दत्तनगर, काकानगर,सूर्यवंशी प्लॉट येथील आणखी घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. येथील आणखी 20 ते 25 कुटुंबांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हरवला आहे आतापर्यंत सुमारे 70 कुटुंबांचे स्थलांतर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.तरी या ठिकाणी असणारी घरे आता पुराच्या विळख्यात अडकली आहेत. कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असून धोक्याच्या पातळीकडे कृष्णा नदी जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.