सांगली - जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सांगली शहरातील जवळपास 40 एमएलडी इतके सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात दररोज मिसळते, याशिवाय नदी काठच्या गावा-गावातील सांडपाणीचाही निचरा कृष्णेच्या पात्रातच होतो. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत प्रदूषण महामंडळाकडून विशेष समिती स्थापन करून नदी प्रदूषणाबाबत कृती आराखडा तयार करत तो शासनाकडे सादर केला आहे.
कृष्णा नदीचे प्रदूषित पाणी सांगलीकर जनतेला प्यावे लागते-
तसेच सांगली शहरातून पुढे जाणारी कृष्णा नदी आणखी मोठ्या प्रमाणात दूषित होते,आणि पुढील शहरांना-गावांना प्रचंड दूषित पाणी प्यावे लागते, पण त्याबाबत कोणालाच काळजी नाही. पालिकेकडून खरंतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प निर्माण करणे गरजेचे आहे, पण ते होताना दिसत नसल्याचे मतही साखळकर यांनी व्यक्त केले.
प्रदूषण बाबत उपयोजना सुरू..!
कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या प्रदूषण महामंडळचे उपप्रादेशिक विभाग हे सांगली मध्ये आहे. येथील अधिकारी नवनाथ औताडे यांच्याशी याबाबत बातचीत केली असता, ते म्हणाले कृष्णा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी प्रवेश केल्यानंतर नदी काठच्या गावातील सांड-पाणी, नदीत कपडे धुणे, जनावरे धुणे,असे अनेक प्रकार गावपातळीवर होत होते,तसेच जिल्ह्यातील नदीकाठचे अनेक साखर कारखाने किंवा इतर कारखाने हे आपले रसायनयुक्त पाणी थेट नदी पात्रात सोडत होते. मात्र प्रदूषण महामंडळाकडून वेळोवेळी कारवाई आणि उपयोजना करण्यात आल्याने कारखान्याचे पाणी आता नदी पात्रात मिसळणे थांबले आहे,आणि आता गाव पातळीवरील प्रदूषण रोखण्यासाठी नियोजन सुरू आहे.
शहराचे सांडपाणी करतंय कृष्णेला प्रदूषित-
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीचे सर्वाधिक प्रदूषण हे सांगली महापालिका क्षेत्रात होते. शहारत दररोज जवळपास 80 एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. यापैकी जवळपास 40 एमएलडी सांड-पाणी हे थेट कृष्णा नदी पात्रात मिसळते, पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने हे सर्व होत आहे. सांगली महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरणासाठी 3 योजना तयार केल्या, पण यातील केवळ 1 अस्तित्वात आली आहे, जी सांगली शहरात शेरीनाल धुळगाव योजना, या योजनेच्या माध्यमातून सांगली शहरातील जवळपास 40 एमएलडी सांडपाणी प्रकियेद्वारे शेतीला देण्यात येत आहे. उर्वरित सांडपाणी हे नदी पात्रात मिसळते, पण तेही शुद्धीकरण करण्यासाठी योजना करण्यात आली असून त्याचे काम सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. लवकरच पालिकेच्या आणखी दोन योजना कार्यान्वित होतील, आणि नदी पात्रात मिसळणारे प्रदूषित पाणी जवळपास बंद होईल आणि प्रदूषण कमी होईल.
टास्क फोर्सची स्थापना आणि कृती आराखडा तयार-
राज्यातील नदी प्रदूषण बाबतीत राष्ट्रीय हरित लवाद आणि शासनाकडून नदी प्रदूषित कृती आराखडा तयार करण्यासाठी नदी पुनोरोथान समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पर्यावरण सनियंत्रण दल स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सांगली विभागाकडून कृष्णा नदीच्या प्रदूषण बाबतीत कृती आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाला सादर ही करण्यात आला आहे. लवकरचं कृती आराखडयानुसार गाव पातळीपासून शहरा पर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी टप्प्या-टप्प्याने उपायोजना करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे औताडे यांनी स्पष्ट केले आहे.
वेळीच प्रदूषण रोखण्याचे गरज-
कृष्णा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत आहे, त्यामुळे शासनाने वेळेची यावर उपयोजना करुन कृष्णा नदीला प्रदूषणाच्या विळख्यातुन सोडवावा, अशी अपेक्षा सांगलीकर नागरीक करत आहे..