ETV Bharat / state

मिरजेत कृष्णा नदीतील पाणी पात्राबाहेर, नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर सुरू

संततधार पाऊस, कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातून सुमारे 56 हजार तर सांगलीच्या चांदोली धरणातून 12 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दोन्ही नदीत सुरू आहे.

कृष्णा नदी पात्राबाहेर
कृष्णा नदी पात्राबाहेर
author img

By

Published : Aug 18, 2020, 12:03 PM IST

सांगली - संततधार पाऊस कायम असल्याने आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मिरजेजवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कृष्णाघाटाच्या ठिकाणी पाण्याने 50 फुटांची पातळी ओलांडली आहे. तर याठिकाणी कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर सुरू आहे.

कृष्णा नदी पात्राबाहेर

संततधार पाऊस, कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातून सुमारे 56 हजार तर सांगलीच्या चांदोली धरणातून 12 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दोन्ही नदीत सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. परिणामी मिरजेतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

हेही वाचा - सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावर पाणी, वाहतूक बायपासमार्गे वळवली

कृष्णाघाट याठिकाणी मंगळवारी सकाळी कृष्णेने 50 फुटांची पातळी ओलांडली. त्यामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर पडली. येथील स्मशानभूमी, आजूबाजूच्या शेतात आणि शेत वस्तीत पाणी शिरले आहे. गतवर्षीचा अनुभव आणि सध्या वाढत असलेली पाण्याची पातळी यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आपल्या जनावरांसह स्थलांतर करण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे.

याठिकाणी सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल असल्याने दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागातील वाढत्या पाण्याचा आढावा घेतला. दोन्ही बाजूच्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याबरोबर स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - चांदोली धरणावर अतिवृष्टी, सकाळपासून विसर्ग सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.