सांगली - हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक मानले जाणाऱ्या मिरजेच्या हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस सुरू झाला आहे. यंदाचे 647 वर्ष असून मानाच्या चर्मकार समाजाच्या गलेफ अर्पणानंतर उरुसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उरूस रद्द करण्यात आले होते. मात्र, काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
हिंदू मुस्लिम भाविकांची उपस्थिती
कोरोनाचा विचार करून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. स्टॉल, खेळणी, पाळणे आणि इतर गोष्टींवर निर्बंध आहेत. उरूसाच्या निमित्ताने दर्ग्यामध्ये भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण दोन वर्षानंतर उरूस सुरु होत, असल्याने भाविकांच्या मध्ये आनंद जरी असला तरी इतर गोष्टींवर निर्बंध असल्याने थोडीशी नाराजी देखील आहे.
हेही वाचा - Marathi Youth Accident : वर्ध्यातील 3 तरुणांचा मध्य प्रदेशात अपघाती मृत्यू, जात होते महादेवाच्या दर्शनासाठी