ETV Bharat / state

कृष्णा आणि वारणेचा पूर हळूहळू ओसरेल - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात आणि सांगली शहरामधील पूर स्थितीची राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Jul 25, 2021, 3:42 AM IST

Updated : Jul 25, 2021, 6:12 AM IST

सांगली - 2019 च्या तुलनेत यंदा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. हळू-हळू हा पूर येत्या काही तासात ओसरायला सुरुवात होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील पूर ओसरल्यावर तातडीने पुर नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटलांनी पूर स्थितीची केली पाहणी..

सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात आणि सांगली शहरामधील पूर स्थितीची राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर रात्री उशिरा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पाटील यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

कृष्णा आणि वारणेचा पूर हळूहळू ओसरेल

हेही वाचा-महापुराच्या धास्तीत असलेल्या सांगलीकरांना दिलासा..! पाणी ओसरायला सुरुवात

2019 च्या तुलनेत प्रचंड पाऊस..

2019 च्या महापुराच्या तुलनेत सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदी आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला धरणातून नियंत्रण ठेवून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पाहता पंचगंगा नदीचा विसर्ग करण्यावर लक्ष आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने अलमट्टीकडे सुरू असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-सांगली : कृष्णेचे पाणी शिरले बाजारपेठेत; तर वारणा, कृष्णाकाठची शेकडो गावे पुराच्या विळख्यात

हळूहळू पुराचे पाणी ओसरेल..

त्यामुळे येत्या काही तासात पुराचे चित्र हळूहळू बदलेल आणि शहरात व गावात शिरलेलं पुराचे पाणी ओसरू लागेल अस, मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच सांगली जिल्ह्यात महापुराने शेती, व्यापार आणि सर्वसामान्य माणसांचे,जे नुकसान झाले आहे,त्याचे पूर ओसराताचं तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची, माहितीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा-नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची काळजी ही प्राथमिकता- मंत्री विश्वजीत कदम

वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची उघडीप

जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाने उघडीप दिला आहे. तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीत वाढणारी पाण्याची पातळी 52 फूटांवर जाऊन स्थिर होऊन सायंकाळी नंतर ओसरू लागेल, असे पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 25, 2021, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.