ETV Bharat / state

आमदार पडळकरांना फिरवणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात; पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी - Gopichand padalkar on sharad pawar

संपूर्ण राज्यभर आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात येत होता. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमु एडके यांनी मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले.

Gopichand padalkar
आमदार पडळकरांना फिरवणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात; पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी
author img

By

Published : Jun 28, 2020, 2:21 PM IST

सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना गाडीवरून घेऊन फिरवणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आमदार पडळकर यांनी विचित्र शब्दांमध्ये टीका केली होती आली होती.

संपूर्ण राज्यभर आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात येत होता. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमु एडके यांनी मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीमध्ये आमदार पडळकर यांच्या विरोधात संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार पडळकर यांचे एक प्रकारे समर्थन केल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात उलट- सुलट चर्चेला उधाण आले होते.

घटनेची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी गंभीर दखल घेत, जत तालुका अध्यक्षांना नगरसेवक एडके यांच्याकडून खुलासा मागवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, नगरसेवक एडके यांच्याकडून याबाबत कोणताच प्रतिसाद देण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मण एडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी जाहीर केला आहे.

नगरसेवक एडके यांचे कृत्य पक्षाच्या विरोधात असल्याने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचा अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या नगरसेवक पदाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, नगरसेवक असणाऱ्या एडके यांना आमदार पडळकरांचे स्वागत आणि दुचाकीवरून फिरवणे चांगलाच महागात पडले असंच म्हणावं लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.