सांगली - जिल्हा परिषद सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली.
मला शिकवू नये,असे वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक पावित्रा घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत गुडेवार यांना सभागृहातुन बाहेर काढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात प्रंचड गदारोळ निर्माण झाला होता.
सांगलीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी प्रशासनाला धरले धारेवर-सांगली जिल्हा परिषदेची बुधवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा प्रचंड वादळी ठरली. सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांनी मागील सभेत झालेल्या ठरावाबाबत काय कारवाई झाली. याचे उत्तर आधी द्या, अशी भूमिका घेत अतिक्रमण, घरकुल या मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. व चुकीचे काम आणि तक्रारी असणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी तक्रारी असलेल्या सर्व ग्रामसेवकांची यादी मागवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सदस्य आणि गुडेवार यांच्यात खडाजंगी-
दरम्यान, भिलवडी ग्रामपंचायतीवर करण्यात आलेल्या बरखास्ती प्रकरणावरून भिलवडीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी प्रश्न उपस्थित करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करण्याआधी बरखास्तीची घोषणा कशी केली. यामुळे ग्रामपंचायतीची बदनामी झाली आहे. ग्रामपंचायतीला जबाबदार कोण? असा जाब विचारात गुडेवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर गुडेवार यांनी मला शिकवू नये, अशी भाषा वापरली. यामुळे वाळवेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभेवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला. यावेळी गुडेवार आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर तमानगौडा रवी पाटील आणि संग्रामसिंह देशमुख यांनी मध्यस्थी केली आणि गुडेवार यांनी माफी मागत दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
हेही वाचा- फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार