ETV Bharat / state

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच चिरला गळा; केला आत्महत्येचा बनाव

पत्नीने पतीचा गळा चिरुन खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत खुनी पत्नीला अटक केली.

author img

By

Published : Mar 22, 2019, 8:15 AM IST

कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी

सांगली - पत्नीनेच पतीचा गळा चिरुन खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने खुनाच्या या घटनेला वाचा फोडली. ही घटना तासगावमधील इंदिरानगरमध्ये बुधवारी मध्यरात्री घडली. शांताबाई कल्लू बागडी असे त्या खुनी पत्नीचे तर कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी खुनी पत्नी शांताबाईला बेड्या ठोकल्या आहेत.

घटनास्थळ

तासगावातील इंदिरानगरात कल्लापा उर्फ कल्लू ( वय -४० ) हा आपल्या पत्नीसह राहतो. कल्लु हा गेल्या काही वर्षापासून क्षयरोगाने ग्रस्त होता. त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती. त्यातच तो सतत शांताबाईवर संशय घेत होता. त्यामुळे शांताबाई पुरती वैतागली होती.

बुधवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. यावेळी मीच मरतो, असे सांगून घरातील चाकूसारखे धारदार शस्त्र घेवून कल्लू घरातून बाहेर पडला. व घराच्या मागील असणार्‍या खोलीत गेला. यावेळी पत्नी शांताबाईही त्याठिकाणी आली. कल्लूने चाकू गळ्याला लावून मरण्याची धमकी दिली. यावेळी शांताबाईने ‘तू कशाला मरतो, मीच तुला मारते’, असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकू लागला. दरम्यान कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी शांताबाईने आणखी एकदा त्याच ठिकाणी चाकूने जोरदार वार केला. त्यामुळे कल्लूचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली. काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडल्याचे दिसून आल्याचे नाटक करत रात्रीच्या सुमारास शांताबाईने थेट पोलीस ठाण्यात जाऊन नवर्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी बारकाईने तपास सुरू केला.

घटनास्थळावरची परिस्थीती पाहता खुनाची शंका आल्याने पोलिसांनी शांताबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी आपणच खून केल्याची शांताबाईने कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av

Feed send - file name - R_MH_1_SNG_21_MARCH_2019_MURDER_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_21_MARCH_2019_MURDER_SARFARAJ_SANADI

स्लग - पतीचा गळा चिरून पत्नीने केला खून,आत्महत्येचा केलेले बनाव उघडकीस आणत पत्नीला केले अटक ..

अँकर - पतीच्या आजारपण आणि चारित्र्यावर घेण्यात येणाऱ्या संशयाला कंटाळून एक पत्नीने गळा चिरून पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सांगलीच्या तासगाव मध्ये हा खुनाचा प्रकार घडला असून पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.
Body:व्ही वो - सांगलीच्या तासगाव मधील इंदिरानगर मध्ये पतीचा खून करून आत्महत्येचा केलाला बनाव तासगाव पोलिसांनी उघडकीस आणत खून करणाऱ्या पत्नीला अटक केली आहे.कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी,वय -४० या व्यक्तीचा त्याच्याच पत्नीने पतीला असलेला क्षयरोग आणि त्यातून चिडून सतत चारित्र्याचा संशय घेणे या कारणातून पत्नी शांताबाई कल्लू बागडी ,वय-३५ हिने रागाच्या भरात हा खून केला आहे. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार झाला.कल्लू बागडी हा क्षयरोगाने गेली काही वर्षे आजारी होता. त्यातून सतत त्याची चिडचिड व्हायची. दरम्यान याच चिडचिडीतून तो पत्नी शांताबाई हिच्यावर सतत चारित्र्यावरुन संशय घ्यायचा.बुधवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली.यावेळी मीच मरतो,असे सांगून घरातील चाकुसारखे धारदार शस्त्र घेवून कल्लू घरातून बाहेर पडला.व घराच्या मागील असणार्‍या खोलीत गेला. यावेळी पत्नी शांताबाईही त्याठिकाणी आली.कल्लूने चाकू गळ्याला लावून मरण्याची धमकी दिली.यावेळी शांताबाईने ‘तू कशाला मरतो, मीच तुला मारते’, असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकु लागला.दरम्यान कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला.यावेळी शांताबाईने आणखी एकदा त्याच ठिकाणी चाकुने जोरदार वार केला.
ज्यामध्ये कल्लूचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली.व काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडला असल्याचे दिसून आल्याचे नाटक करत रात्रीच्या सुमारास शांताबाई हिने थेट स्वतः पोलिसांत जाऊन नवर्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली.मात्र पोलिसांना संशय आल्याने तपास सुरू केला.ज्या मध्ये
घटनास्थळीचे वातावरण व परिस्थीती पाहता पोलिसांनी खुनाची शंका आल्याने शांताबाई हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच खून केल्याचे कबूल शांताबाई बागडे हिने दिल्याचे तासगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.