सांगली - जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा कहर झाला आहे. एका दिवसात तब्बल 2 हजार 328 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या रुग्ण संख्येचा उच्चांक गुरुवारच्या रुग्णसंख्येमुळे मोडला गेला आहे. 38 जणांचा एका दिवसात मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद -
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून हजारांच्यावर असणारी रुग्णसंख्या गुरुवारी 2 हजारच्या पुढे गेली आहे. एका दिवसात तब्बल 2 हजार 328 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. आता पर्यंतच्या रुग्ण संख्येचा उच्चांक यामुळे मोडला गेला आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 38 जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला एक हजार 134 जण कोरोना मुक्त झाले आहेत. एकाच दिवसात 2 हजारच्या पुढे रुग्ण आढळल्याने प्रशासनही हादरून गेले आहे.
एक नजर जिल्ह्यातील गुरुवारच्या कोरोना स्थितीवर -
जिल्ह्यात आज दिवसभरात 2,328 कोरोना ररुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील 38 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला.
अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 15,902 वर गेली आहे.
उपचार घेणारे 1,134 जण आज कोरोना मुक्त झाले आहेत.
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 85 हजार 647 वर गेली आहे.
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 68,264 आहे.