ETV Bharat / state

चांदोलीत अतिवृष्टी कायम; धरण ९१ टक्के भरल्याने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू - varna

शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या २४ तासात १४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या ३१.७५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

चांदोली धरण
author img

By

Published : Aug 3, 2019, 3:13 PM IST

सांगली- चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून धरण ९१ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने आजपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चांदोली धरण

शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. शुक्रवारपासून १४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या ३१.७५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. धरणात होणारी लक्षणीय पाणी वाढ पाहता, धरण प्रशासनाकडून गुरुवारपासून धरणातून वारणा नदी पात्रात चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी धरणाचे चार वक्राकार दरवाजे अडीच फुटाने उघडले. धरणातून ८७६८ क्युसेक तर वीज निर्मिती गृहातून ८४० क्युसेक असा एकूण ९६०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होत आहे.

तर धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने आता चांदोली धरण ९१.८८ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सुमारे १३ हजार १९१ क्युस्केस इतक्या पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पूरपातळीत आणखी वाढ होणार असल्यामुळे, पाटबंधारे विभागाने वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

File name - mh_sng_01_chandoli_pani_visarg_vis_1_7203751 - mh_sng_01_chandoli_pani_visarg_vis_3_7203751

स्लग - चांदोलीत अतिवृष्टी कायम, 91 टक्के धरण भरल्याने वाढवण्यात आला विसर्ग,वारणेच्या पूर स्थितीत होणार वाढ..

अंकर - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे.यामुळे चांदोली धरण 91 टक्के भरले आहे.धरणातून वारणा नदीत पाण्याची विसर्ग सुरू आहे .मात्र पाऊसाची संततधार सुरूच असल्याने आजपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.13 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पूर स्थितीत आणखी वाढ होणार असल्याने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.Body:शिराळयाच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. 144 मिलिमीटर इतका पाऊस गेल्या 24 तासात झाला असून संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली आहे.34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या 31.75 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.तर दुसऱ्या बाजूला या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.धरणात होणाऱ्या लक्षणीय पाणी वाढ पाहता, धरण प्रशासनाकडून गुरुवारपासून धरणातून वारणा नदी पात्रात चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता, आता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन वाढवण्यात येत आहे.शुक्रवारी धरणाचे चार वक्राकार दरवाजे अडीच फुटाने उचलुन या दरवाजातुन ८७६८ हजार क्युसेक तर वीज निर्मिती गृहातुन ८४० क्युसेक असा एकूण ९६o४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत केला जात होता.

तर धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने आता चांदोली धरण 91.88 टक्के भरल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे.सुमारे 13 हजार 191 हजार क्यूस्केस इतक्या पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहेत. त्यामुळे वारणा नदीच्या पूरपातळीत आणखीन वाढ होणार असल्यामुळे, पाटबंधारे विभागाने वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.