सांगली - सांगली शहरासह परिसरामध्ये आज दुपारनंतर जोरदार पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते.
हेही वाचा - ओबीसी आरक्षण प्रकरणी आघाडी सरकार विरोधात भाजपचे कृष्णा नदी पात्रात आंदोलन
केरळमध्ये गुरुवारपासून पावासाने हजेरी लावली. तर 11 जून नंतर महाराष्ट्रात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, अंदाजित तारखेआधीच सांगलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ सांगली शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. पहिल्याच पावसाने सांगली शहरातले अनेक रस्ते जलमय झाले.
मशागतीच्या कामांवर परिणाम..
11 जून नंतर राज्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे पेरणीच्या कामांना अद्याप वेग आला नाही. मशागतीचे काम अद्याप सुरू आहे. अशात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसाचा दणका शेतकऱ्यांना बसला असून पावसाच्या उघडीप नंतर आता शेतकऱ्यांना मशागती आणि पेरण्या कराव्या लागणार आहेत. मात्र, वेळेत पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.
हेही वाचा - परदेशी कंपनीकडून द्राक्ष निर्यातदार कंपनीला गंडा, संचालकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल