सांगली - दिव्यांग दिना दिवशीच विविध मागण्यांसाठी दिव्यांगांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. भारतीय सांकेतिक भाषेला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यासह इतर मागण्यांसाठी सांगली जिल्हा मुकबधीर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा- विक्रम लँडरचा शोध लागला; नासाच्या लुनार ऑर्बिटरने घेतली छायाचित्रे
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भारतीय सांकेतिक भाषा ही मूक-कर्णबधीर यांची भाषा म्हणून ओळखली जाते. मात्र, या भाषेला अधिकृत मान्यता अजून देण्यात आली नाही. त्यामुळे भारताची अधिकृत भाषा म्हणून भारतीय सांकेतिक भाषेला मान्यता देण्यात यावी. तसेच देशातील सर्व शासकीय व अशासकीय कार्यालयात सांकेतिक भाषाचा वापर करून सूचना फलक लावण्यात यावेत. ज्यामुळे संभाषण अपरिपक्व असणाऱ्या मुकबधीर बांधवांना याचा लाभ होईल,अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.