सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या डफळापुर नजीक असणाऱ्या कुडनूर गावात एक खळबळ जनक घटना घडली आहे. शाळेमध्ये हॅन्ड ग्रॅनेड बॉम्ब सापडला ( Hand Grenade Found In School Sangli ) आहे. शाळेच्या मुलांना खेळत असताना एका खोलीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे एकच खळबड उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने धाव घेऊन हँड ग्रेनड बॉम्ब ताब्यात घेतला आहे.मात्र येथे हा बॉम्ब कसा आला ? त्याबाबत तपास सुरू झाला आहे.
शाळेमध्ये सापडला बॉम्ब - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापुर जवळील कुडनूर या गावी मराठी मुलांच्या शाळेमध्ये हॅन्ड ग्रॅनेड बॉम्ब सापडला आहे. शाळेची मुले बॉलने खेळत असताना खिडकीतून चेंडू आत गेल्याने तो चेंडू आणण्यासाठी मुले खोलीत गेले होते. त्यावेळी मुलांना बॉम्ब नजरेस पडल्या नंतर मुलांनी ग्रामस्थांनी याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेमध्ये धाव घेतली होते, याची माहिती जर पोलिसांनाही देण्यात आली.
-
Maharashtra | A hand grenade was found at school in Kudnur village of Sangli dist when some school children went inside a room in the premises as their ball went inside through the window. Police along with a bomb squad reached the spot immediately:Ajay Sidankar, Police Inspector pic.twitter.com/u92VhE7EXv
— ANI (@ANI) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | A hand grenade was found at school in Kudnur village of Sangli dist when some school children went inside a room in the premises as their ball went inside through the window. Police along with a bomb squad reached the spot immediately:Ajay Sidankar, Police Inspector pic.twitter.com/u92VhE7EXv
— ANI (@ANI) July 30, 2022Maharashtra | A hand grenade was found at school in Kudnur village of Sangli dist when some school children went inside a room in the premises as their ball went inside through the window. Police along with a bomb squad reached the spot immediately:Ajay Sidankar, Police Inspector pic.twitter.com/u92VhE7EXv
— ANI (@ANI) July 30, 2022
त्यानंतर जत पोलिसांच्या सह बॉम्ब शोधक व श्वान पथक देखील कुडनूर गावामध्ये दाखल झाले. पोलिसांनी बॉम्ब ताब्यात घेतला आहे. मात्र हा बॉम्ब या ठिकाणी कसा आला ? तो कोणी टाकला ? हा प्रश्न पोलिसांच्या समोर निर्माण झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर या आधी 2017 ला अशीच घटना समोर आली होती. कुडनूर गावात दोन बॉम्ब सापडले होते.
हेही वाचा - Lightning Fell in Vaigaon : वीज पडून चार महिलांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश