सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या आणि कष्टकरी लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. कुरळप येथील पैलवाव अशोक पाटील हे गरिबांच्या मदतीला धावून आले आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पाटील यांनी स्व-खर्चातून आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अन्नधान्य वाटप केले.
गेल्या 20 ते 25 दिसांपासून घरात बसून असल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इस्लामपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तेथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कडक शिस्त लावल्याने त्याचा परिणाम सध्या परिसरातील गावांनाही झाला आहे. पाटील यांनी स्व-खर्चातून गरिब कुटुंबातील 700 लोकांना पंधरा दिवस पुरेल असे 5 किलो ज्वारी, 1 किलो तेल, बेसन पीठ, साबण यासारख्या वस्तू घरपोच भेट म्हणून देण्यात आल्या.