ETV Bharat / state

सांगलीच्या गणेशोत्सवावर महापुराचा परिणाम - ganesh festival in sangli

सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने सांगलीत मात्र महापुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याने दरवर्षी बघायला मिळणारा गणेशोत्सवाचा उत्साह यावर्षी मावळला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या गणेश स्टॉलवर गणेश चतुर्थीच्या पुर्वार्धात ज्या प्रमाणात गर्दी होते ती न होता तुरळक प्रमाणात या ठिकाणी गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी भाविक येत आहेत.

सांगली गणेशोत्सव
author img

By

Published : Sep 1, 2019, 5:10 PM IST

सांगली- महापुराने थैमान घातल्यामुळे यंदा सांगलीच्या गणेशोत्सवावर परिणाम झाला आहे. अवघा एक दिवस उरला असताना गणेशोत्सवाचा उत्साह गणरायाच्या सांगली नगरीत बघायला मिळत नाही. गणेश चतुर्थीच्या आधी गर्दी होणाऱ्या बाजारपेठ आणि स्टॉलवर तुरळक प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी दिसून येत आहे.

सांगलीच्या गणेशोत्सवाबद्दल स्थानिकांकडून माहिती घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराचा फटका सर्व पातळ्यांवर बसला आहे. यंदाच्या गणेशोत्सवावरही या महापुराचे सावट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गणेश मुर्तीकारांसह व्यावसायिकांवरही या महापुराचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. अनेक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गणेश मंडळांनी केवळ मुर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. घरगुती गणपतीवरही महापुराचा परिणाम झाला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या गणेश स्टॉलवर गणेश चतुर्थीच्या पुर्वार्धात ज्या प्रमाणात गर्दी होते ती न होता तुरळक प्रमाणात या ठिकाणी गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी भाविक येत आहेत.

हेही वाचा- पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, प्रसंगी टोकाचा संघर्ष करू - राजू शेट्टी

Intro:file name -
mh_sng_02_ganesh_utsav_pur_sawat_1_7203751

स्लग - गणेशोत्सवावर महापुराचे सावट ,गणेश मूर्ती खरेदीला अल्प प्रतिसाद...

अँकर - महापूराची मोठं सावट यंदा सांगलीच्या गणेशोत्सवावर दिसून येत आहे.अवघा एक दिवस उरला असताना गणेशोत्सवाचा उत्साह गणरायाच्या सांगली नगरीत पाहायला मिळत नाही.गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी झुंबड उडणाऱ्या बाजारपेठ आणि स्टॉलवर तुरळक प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी दिसून येत आहे.गणेश मूर्तींची संख्या कमी असूनही मागणीही कमी झाल्याचे परिणाम महापुरामुळे जाणवत आहे.महापूराचा गणेश मूर्ती खरेदीवर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला आहे.सांगली ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..

Body:व्ही वो - कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापूराचा फटका सर्व पातळ्यांवर बसला आहे.यंदाच्या गणेशोत्सवावर ही या महापुराचा सावट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.गणेश मूर्तिकार असू किंवा या गणेश उत्सवाशी निगडित असणाऱ्या सर्व व्यवसायावर महापुराचा परिणाम झाल्याचं प्रमाणात जाणवत आहे.अनेक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.तर अनेक गणेश मंडळांनी केवळ मूर्त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. घरगुती गणपतीवरही महापुराचा परिणाम पाहायला मिळतोय. गणेश मुर्त्या खरेदीला मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे गणेशोत्सवावर महापुराचे सावध कशा पद्धतीने आहे हे पाहायला मिळतं शहरातल्या मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या गणेश स्टॉलवर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ज्या प्रमाणात गर्दी होते ती सध्या पाहायला मिळत नाहीये तुरळक प्रमाणात या ठिकाणी गणेश मुर्त्या खरेदी करण्यासाठी भाविक पोहोचत आहेत विशेष म्हणजे रविवारचा दिवस असून सुद्धा या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळत नसल्याचं,तसेच दरवर्षीप्रमाणे गणेश मूर्ती खरेदीला भाविकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं मत विक्रेत्यांच्या मधून व्यक्त करण्यात येतोय.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.