सांगली - प्रेम प्रकरणातून एका मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे ही घटना घडली आहे. प्रभू सुर्यवंशी ( वय 22 ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सुनील शिंदे असे आरोपीचे नाव आहे. नात्यातील तरुणीशी असणाऱ्या प्रेम प्रकरणातून सुनील याने तरूणीने आत्महत्या केल्याच्या चुकीच्या माहितीतून रागाचा भरात प्रियकर असणाऱ्या प्रभू सुर्यवंशीची हत्या केली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहितीनुसार, मूळ कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील प्रभू सुर्यवंशी आणि सुनील सुर्यवंशी हे दोघेही मित्र असून दोघेही कामा निमित्ताने मिरजेत राहतात. प्रभु सुर्यवंशी हा सुनील याच्या एका नातेवाईकांच्या हॉटेलमध्ये कामाला होता. या दरम्यान प्रभू याचे एका तरुणीशी सूत जुळले. तर तरुणी ही सुनील याच्या नात्यातील होती. प्रभू याचे प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी आणि त्याची प्रेयसी या दोघांनी सुनील व त्याच्या नातेवाईकांच्या समोर आम्ही दोघेही दोघांचे एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही लग्न करणार आहोत आणि जर त्याला विरोध केला तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकी दिली होती. मात्र तरुणीच्या नातेवाईकांना लग्नाला विरोध केल्याने त्या ठिकाणी वादाचा प्रकार घडला होता.
फोन आला आणि त्याने मित्राला ठार केले : मित्र सुनील याने प्रभु याला आपण गावी जाऊ असो सांगत त्यांच्या आणखी एक मित्र ज्ञानदेव सूर्यवंशी याला सोबत घेतले. तिघेजण दुचाकीवरुन लंगरपेठ या गावी निघाले होते. यादरम्यान मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे पोहोचले असता सुनील याला घरातून फोन आला. त्यावरून त्याच्या कुटुंबाकडून या नात्यातल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी देण्यात आली. ही बातमी ऐकताच सुनील याचा राग अनावर झाला. त्यातून त्याने प्रभू याला तुझ्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला, असे सांगत लाकडी दांडक्याने प्रियकर असणारा मित्र प्रभू याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये प्रभू हा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेतत प्रभू याला मिरजेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना रविवारी प्रभू याचा मृत्यू झाला आहे.
फोनवरून दिलेले माहिती निघाली खोटी : दरम्यान सुनील याला तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली ती तरुणी जिवंत आहे. पण त्या खोट्या माहितीमुळे सुनील याने चिडून प्रभु याचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक..! पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार