सांगली - देशभरात महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. बसर्गी (ता. जत) येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर मोबाईलचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. किशोर संकपाळ (वय 20, रा. बसर्गी ता. जत), असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जत तालुक्यातील दोन महिन्यात अत्याचाराची ही दुसरी घटना घडली आहे. बिसल सिद्धेश्वर मंदिराजवळ एका महिलेवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच ही धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - तासगाव नजीक तिहेरी अपघात, एसटीतील 19 प्रवाशी जखमी
बसर्गी येथील चार वर्षीय चिमुकली आपल्या घराजवळ बुधवारी (दि. 11 डिसें) खेळत होती. त्यावेळी गावातच राहत असलेल्या संशयित किशोर राजेंद्र संकपाळ या अकरावीत शिकणाऱ्या तरुणाने तिला मोबाईलचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि अश्लील चाळे करू लागला. घाबरलेली चिमुकलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत पळत काढत आई-वडिलांना याबाबत सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (दि. 12 डिसें) मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके करत आहेत.
हेही वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयातून गळा दाबून पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक