ETV Bharat / state

सांगलीमध्ये आणखी चार नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईहून आलेले तिघे, तर संपर्कातील एकास बाधा - Sangali corona update

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी आणखी चार व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील झोळंबी येथील एका तरुणाला कोरोना लागण झाली आहे.१६ मे रोजी मुंबईच्या विक्रोळी येथून आष्टा येथे आला होता.

Civil hospital miraj
शासकीय रुग्णालय मिरज
author img

By

Published : May 24, 2020, 4:38 PM IST

सांगली - जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिराळा, वाळवा, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील हे चार व्यक्ती आहेत. यामधील ३ जण मुंबईवरून आले होते, तर एक जण मुंबईहूनन आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहे. सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून, तर एक कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३२ झाला आहे. जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी आणखी चार व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील झोळंबी येथील एका तरुणाला कोरोना लागण झाली आहे. १६ मे रोजी मुंबईच्या विक्रोळी येथून आष्टा येथे आला होता. झोळंबी येथील एका शाळेत कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील मुंबई वरून आलेल्या ४८ वर्षीय एका व्यक्तीला कोरोनाला लागण झाली आहे. २१ मे रोजी तो व्यक्ती हा मुंबई वरून आल्यानंतर त्या व्यक्तीला थेट मिरज कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर सध्या या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.

आटपाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती हा १८ मे रोजी मुंबईहून आला होता. त्याला कम्युनिटी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच बरोबर शिराळा तालुक्यातील मोहरे येथील एकाला कोरोना लागण झाली आहे. हा व्यक्ती मुंबई वरून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील असून, तो शिराळा येथील इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल रविवारी प्राप्त झाले असून ते पॉझिटिव्ह आले आहेत. यासर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जतच्या अंकली येथे मुंबईवरून आलेला कोरोनाबाधित व्यक्ती रविवारी कोरोना मुक्त झाला. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून डिस्चार्ज देत १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे. तर रविवारी चार नवे रुग्ण आणि एक जण कोरोना मुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ३२ वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.