ETV Bharat / state

जाणून घ्या काय आहे कनेक्शन, राजू शेट्टींच्या प्रचारासाठी दक्षिणेतील 'हा' सुपरस्टार सांगलीत येणार - राजू शेट्टी

प्रकाश राज हे भाजपच्या विरोधात कर्नाटकच्या बंगळुरू मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तेथील प्रचार संपल्याबरोबर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढणाऱ्या डाव्या आणि शेतकरी संघटनांच्या चळवळीतील उमेदवारांच्या प्रचारालाही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे.

राजू शेट्टी
author img

By

Published : Apr 10, 2019, 6:37 AM IST

सांगली - राजकीय पक्ष हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींची 'स्टार प्रचारक' म्हणून मदत घेत आहेत. महाआघाडीचे उमदेवार असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारालाही दक्षिणेतील सुपरस्टार प्रकाश राज येणार आहेत.

बॉलिवूड व टॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज १९ एप्रिलला हातकणंगले मतदार संघात सभा घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. प्रकाश राज हे लोकशाही वाचवण्याचे सभेतून आवाहन करणार आहेत. अनेक बुद्धिवादी आणि कलावंतानी पुढे यायला पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात प्रकाश राज यांनी आवाज उठविला आहे. मोदींनी त्यांना त्रास दिल्याचा दावा शेट्टी यांनी केला.

प्रकाश राज हे भाजपच्या विरोधात कर्नाटकच्या बंगळुरू मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तेथील प्रचार संपल्याबरोबर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढणाऱ्या डाव्या आणि शेतकरी संघटनांच्या चळवळीतील उमेदवारांच्या प्रचारालाही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे.

Prakash Raj
प्रकाश राज

असे आहे राजू शेट्टी आणि प्रकाश राज यांचे 'कनेक्शन'
राजू शेट्टी आणि प्रकाश राज यांची किसान शक्तीच्या मोर्चामुळे ओळख झाली. राजू शेट्टी यांचा सहभाग असलेल्या किसान यात्रेचे दक्षिणेत प्रकाश राज यांनी बंगळुरू आणि मद्रास येथे जोरदार स्वागत केले होते. मोदी विरोधात भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टी यांना बळ देण्यासाठी प्रकाश राज हातकणंगले मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

सध्या सगळीकडे निवडणूक प्रचारासाठी सिने कलाकारांना घेत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका उडविला आहे. सांगलीतही सेलिब्रिटी प्रकाश राज येणार असल्याने येथील निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढणार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send - file name - R_MH_1_SNG_09_APR_2019__PRAKASH_RAJ_PRACHAR_ON_SHETTI_SARFARAJ_SANADI.

स्लग - राजू शेट्टींच्या प्रचारासाठी दक्षिणेतील सुपरस्टार प्रकाश राज लावणार उपस्थिती...

अँकर - बॉलिवूड व टॅलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी येणार आहेत.१९ एप्रिल रोजी प्रकाश राज हे लोकशाही वाचवण्याचे आवाहन करण्यासाठी हातकणंगले मतदार संघात सभा घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.Body:व्ही वो - सध्या सगळीकडे निवडणूक प्रचारासाठी सिने कलाकारांना घेऊन सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडका उडवला आहे,तर काही कलाकारांना थेट निवडणूकीच्या रिंगणात सुद्धा उतरवले आहे.तर या लोकसभा निवडणुकीत स्वतः मोदींच्या विरोधात कर्नाटकच्या बंगळुरू मतदार संघातुन उतरलेले बॉलीवुड आणि दक्षिणेतील सुपरस्टार प्रकाश राज आपल्या प्रचार संपल्या बरोबर मोदी विरोधात लढणाऱ्या डाव्या आणि शेतकरी संघटनांच्या चळवळीतील उमेदवारांच्या प्रचारालाही उपस्थितीत लावणार आहेत.सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रकाश राज १९ एप्रिल रोजी येणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ प्रकाश राज सभा घेणार आहेत.राजू शेट्टी यांची आणि प्रकाश राज यांची किसान शक्तीच्या मोर्चामुळे ओळख झाली होती.राजू शेट्टी यांचा सहभाग असलेल्या किसान यात्रेचे दक्षिणेत प्रकाश राज यांनी बंगळुरू आणि मद्रास येथे जोरदार स्वागत केले होते.त्यामुळे शेट्टी आणि राज यांची ओळख आणखी घट्ट झाली.शेट्टी यांच्या कार्याचा प्रकाश राज यांच्यावर चांगलाचं प्रभाव असल्याने व मोदी विरोधात भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टी यांना बळ देण्यासाठी प्रकाश राज हे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी येणार आहेत.तर लोकशाहीची ताकत वाढवण्यासाठी प्रकाश राज त्यांच्या स्वतःचा निवडणूक प्रचार संपवून १९ एप्रिल रोजी आपल्या विजयासाठी प्रचार सभा घेण्यासाठी येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

बाईट - राजू शेट्टी - उमेदवार,स्वाभिमानी शेतकरी संघटना,हातकणंगले लोकसभा मतदार संघ.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.