सांगली - आटपाडी येथे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पिस्तुल विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 देशी बनावटीचे पिस्तुल, 15 जिवंत काडतुसे आणि 5 मॅगझीन जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा - आमदार घरचा हवा की बाहेरचा, राज ठाकरेंचा कोथरुडकरांना सवाल
सांगलीच्या देवा उर्फ देवेंद्र सांगवे (वय 24, रा. चिंचवड, पुणे) आणि बाला उर्फ बालाजी आदाटे (वय 22, रा. आटपाडी, सांगली) अशी या तरुणांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आटपाडीमार्गे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याकडे एका सिल्व्हर कलरच्या एर्टीग गाडीतुन पिस्तुल तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने आटपाडी ते नाझरे यामार्गावर सापळा रचून संशयित एर्टीग गाडीला थांबवून झडती घेतली. यावेळी ड्रायव्हर सीटच्या खाली 5 पिस्तुल, 15 जिवंत काडतुसे आणि 5 मॅगझीन आढळून आले,यावेळी पोलिसांनी सर्व मुद्देमाल व गाडी असा एकूण 9 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करत दोघा तरुणांना अटक केली.
हेही वाचा - पाच दिवसांपासून नाशिकच्या HAL कर्मचाऱ्यांचा संप सुरू; शरद पवारांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट